
Election Commission | निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी सर्च कमिटीने गुरुवारी निवडणूक समितीला नाव पाठवली आहेत. यात प्रवर्तन निर्देशालयाचे (ईडी) माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा (आयआरएस) आणि एनआयए प्रमुख दिनकर गुप्तासह 10 जणांची नाव आहेत. या यादीत माजी सीबीडीटी प्रमुख पी सी मोदी (आयआरएस) आणि जेबी महापात्र (आयआरएस) आणि राधा एस चौहान (आयएएस) यांची नाव सुद्धा आहेत. दोन निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक समितीची बैठक होईल. पीएम मोदी यांनी या बैठकीसाठी कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांना सुद्धा बोलावल आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने अधीर रंजन चौधरी सुद्धा या बैठकीत सहभागी होतील.
निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्तांची दोन पद रिक्त आहेत. ही दोन रिक्त पद भरण्यासाठी पाच उमेदवारांची एक यादी बनवण्यासाठी बुधवारी संध्याकाळी कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांची बैठक झाली. निवड समितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निवडणूक आयोगाच्या दोन सदस्यांची नियुक्ती करतील. नियुक्ती निश्चित झाल्यानंतर नव्या कायद्यातंर्गत झालेली ही पहिली नियुक्ती असेल. सर्च कमिटीने जे नाव पावठलेलं नाही, अशा व्यक्तीची निवड करण्याचाही अधिकारही कायद्याने तीन सदस्यीय निवड समितीला आहे.
निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी नवीन कायदा
अनूप चंद्र पांडे 14 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले आणि आठ मार्चला अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे निवडणूक आयुकांची दोन पद रिक्त झाली आहेत. अरुण गोयल यांचा राजीनामा 9 मार्चला स्वीकारला गेला. दोन सदस्य नसल्याने सध्या निवडणूक आयोगात राजीव कुमार हे एकच मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी अलीकडेच नवीन कायदा बनवण्यात आला आहे. त्याआधी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सरकारच्या शिफारशींवर राष्ट्रपती करायचे. परंपरेनुसार, सर्वात वरिष्ठाला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषित केलं जायच.