AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाबरले… बॅकफूटवर… मोठा धक्का बसताच ट्रम्प हतबल, इस्रायलचेही कानपिळले; आता इराणवर…

इराण अमेरिका युद्ध पेटले आहे. अनेक देश युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता थेट तेल रिफायनरीला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. कुठेतरी इस्त्रायल आणि अमेरिका या युद्धात मागे पडल्याचे बघायला मिळतंय.

घाबरले... बॅकफूटवर... मोठा धक्का बसताच ट्रम्प हतबल, इस्रायलचेही कानपिळले; आता इराणवर...
Donald Trump
| Updated on: Mar 19, 2026 | 12:59 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्याला मोठा धोका निर्माण झाला. इस्त्रायलकडून इराणच्या गॅस सुविधांवर मोठा हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणकडून थेट कतार आणि यूएईमधील रिफायनरीला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. यामुळे जगातील मोठं संकट ओढवलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. यासोबतच इस्त्रायल पुन्हा गॅस संबंधित सुविधांवर हल्ला करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर तेहरानने कतारच्या द्रवीकृत नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांवर आणखी हल्ले केले, तर वॉशिंग्टन दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर मोठा बॉम्बहल्ला करू शकतो, अशीही थेट धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे भविष्य खूप जास्त वाईट असेल असेही म्हटले आहे. कतारच्या एलएनजीवर पुन्हा हल्ला झाला नाही पाहिजे नाही तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जोपर्यंत इराण कतारवर पुन्हा हल्ला करत नाही, तोपर्यंत इस्रायल गॅस क्षेत्रावर कोणताही पुढील हल्ला करणार नाही. या अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान साउथ पार्स क्षेत्रावर इस्रायलकडून कोणताही पुढील हल्ला होणार नाही. थोडक्यात काय तर आता इस्त्रायकडून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर टार्गेट करून हल्ले केले जाणार नाहीत. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

मध्यपूर्वेत घडलेल्या घटनेमुळे इस्त्रायलकडून इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रातील मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची माहिती इस्त्रायलकडून वॉशिंग्टनला देण्यात आली नव्हती, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता इस्त्रायलचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कान पिळण्यात आली आहेत.

आता खरोखरच इस्त्रायल इराणच्या गॅस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणार नाही का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अगोदरच तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. त्यामध्येच आता थेट तेल प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जात असल्याने जग संकटात आलंय. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम