Seema Haider | सीमा हैदरचे दिवस पालटणार, एका बिझनेसमॅनकडून नोकरीची ऑफर, इतक्या लाखांच पॅकेज
Seema Haider | सचिन आणि सीमा हैदर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. हे समजल्यानंतर त्या बिझनेसमॅनने सीमा हैदरला एक चिठ्ठी पाठवली. सुरक्षेसाठी तैनात जवानावे सीमाला चिठ्ठी उघडण्यापासून रोखलं.

नवी दिल्ली : प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सीमा हैदरच एकूणच सर्व वर्तन संशयास्पद असल्यामुळे तिची यूपी ATS कडून चौकशी सुद्धा झाली. सीमा तिच्या चार मुलांसह भारतात आलीय. सीमा हैदरच शिक्षण फार नसलं, तरी तिला टेक्नोलॉजीची उत्तम जाण आहे. ती मोबाईल खुबीने ऑपरेट करते. त्याशिवाय इंग्रजी भाषेवर सुद्धा तिची पकड आहे. त्यामुळे सीमा हैदरवर हेर असल्याचा संशय घेण्यात आला.
पबजी खेळताना सीमा हैदर सचिन मीणाच्या प्रेमात पडली. त्यासाठी ती पाकिस्तानसोडून भारतात आली. ती भारतीय वृत्तवाहिन्यांना सातत्याने मुलाखती देत असल्याने चर्चेत आहे.
काय आहे नोकरीची ऑफर?
सचिन आणि सीमा हैदर आर्थिक संकटाचा सामना करत असल्याच समोर आल्यानंतर एका प्रोड्युसरने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. आता गुजरातच्या एका बिझनेसमनने तिला नोकरीची ऑफर दिलीय. उद्योजकाने सचिन आणि सीमा दोघांना नोकरीची ऑफर दिली आहे. दोघांना महिना प्रत्येकी 50 हजार रुपये वेतन देण्याची सुद्धा तयारी दाखवलीय.
चिठ्ठी उघडण्यापासून रोखलं
यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये रबूपुर गावात सचिन आणि सीमा राहतात. रात्री उशिरा पोस्टमन एक चिठ्ठी घेऊन सचिन-सीमाच्या घरी आला. सीमाला ती चिठ्ठी उघडून त्यात काय लिहिलय ते वाचायच होतं. पण सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाने रोखलं. ही धमकीची चिठ्ठी असू शकते असं त्याला वाटलं. वर्षाच पॅकेज किती झालं?
जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या आदेशाने चिठ्ठी उघडली, त्यावेळी कळलं की, गुजरातच्या एका व्यावसायिकाने त्यात नोकरीची ऑफर दिली होती. सचिन आणि सीमा दोघांना महिना 50 हजार रुपये पगाराची ऑफर दिली होती. म्हणजे दोघांचा वर्षाच पॅकेज प्रत्येकी 6 लाख रुपये होतं.
