Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

| Updated on: Jul 19, 2021 | 3:10 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला चढवला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. (narendra modi)

Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
narendra modi
Follow us on

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला चढवला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी विरोधक गोंधळ घालत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिला मंत्री झाल्याचं काहींना पटलेलं दिसत नाही. त्यांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला. (Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)

लोकसभा आणि राज्यसभेत नव्या मंत्र्यांचा पंतप्रधानांनी परिचय करून देण्यास सुरुवात केली. मोदी मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे राहताच दोन्ही सभागृहात गोंधळ झाला होता. त्यावरून मोदींनी विरोधकांना सुनावले. लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आणि मंत्र्यांचा परिचय करू देण्याची विनंती केली. परंपरेला छेद देऊ नका. तुम्ही दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तुम्ही परंपरेला तोडून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका. सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा. पंतप्रधान हे सभागृहाचे नेते आहेत. ते नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं, असं आवाहन बिरला यांनी केलं.

मला वाटलं सभागृहात उत्साह असेल

आज दलित समाजातील काही नेते मंत्री झाले आहेत. अनेक मंत्री ग्रामीण भागातील आहेत. पण काही लोकांना हे पटलेलं नाही. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला आणि ओबीसी आदी घटकातील लोक मोठ्या संख्येने मंत्री झाले आहेत. त्यामुळे सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, असंही ते म्हणाले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील लोकांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांची ओळख करून देत असताना विरोधकांना आनंद व्हायला हवा होता. पण दलित मंत्री बनावा, महिला मंत्री व्हाव्यात, ओबीसी मंत्री व्हावेत, शेतकऱ्यांची मुलं मंत्री व्हावेत हे काही काही लोकांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळेच ते परिचय करून देत असताना गोंधळ घालत आहेत, अशी टीका मोदींनी केली.

प्रल्हाद जोशींचं शांततेचं आवाहन

राज्यसभेतही मोदी मंत्र्यांचा परिचय करून देत असताना गोंधळ झाला. त्यामुळे मोदींनी विरोधकांना फैलावर घेतलं. आज शेतकऱ्यांची मुलं मंत्री बनले आहेत. त्यांचा परिचय करून देत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. नव्या महिला मंत्र्यांचाही परिचय करून दिला जात आहे. पण त्यांचं नावही ऐकून घेण्यास काही लोक तयार नाहीत. ही कोणती महिला विरोधी मानसिकता आहे?, असा सवाल मोदींनी केला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यात येत असून त्यात व्यत्यय आणू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. (Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)

 

संबंधित बातम्या:

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

Monsoon Session Live : 8 व्या मिनिटाला गदारोळ, मोदी म्हणाले, महिला, दलित मंत्री झालेले बघवत नाही का?

लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या

(Seems Some People Can’t Digest More Women, SCs, STs as Ministers, Says PM Modi)