लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. (PM Narendra Modi)

लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या
PM Modi

नवी दिल्ली: आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असं आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरं देण्याची सरकारला संधीही द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं. (Ask Tough Questions, Allow Government To Respond, PM Narendra Modi Tells Opposition)

कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी सभागृहात सहकार्य करा. आपण बाहुवर व्हॅक्सिन घेतली आहे. बाहुवर व्हॅक्सिन घेतल्याने तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बाहुबली बनण्याचा हा एकमेव उपाय आहे. बाहुवर लस घेणं हाच पर्याय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनावर प्राधान्याने चर्चा करा

आतापर्यंत 40 कोटीहून अधिक लोक कोरोना विरोधात बाहुबली बनले आहेत. संपूर्ण जगाला या महामारीने घेरलं आहे. मानव जातीला घेरलं आहे. त्यामुळे संसदेत या संदर्भात चर्चा व्हावी. प्राधान्याने त्यावर चर्चा व्हावी. व्यवहारी सूचना याव्यात. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी नव्याने उभं राहता येईल. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येईल, असं आवाहनही त्यांनी केलं.

सरकार उत्तरं द्यायला तयार

सभागृहाचं कामकाज परिणामकारक झालं पाहिजे. सार्थक चर्चा झाली पाहिजे. देशातील लोकांना जी उत्तरं हवी आहेत. सरकार त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा. पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे. तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी. कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजे, असंही मोदी म्हणाले. (Ask Tough Questions, Allow Government To Respond, PM Narendra Modi Tells Opposition)

 

संबंधित बातम्या:

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा; राऊतांची मागणी

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

Mumbai Rains Live Updates | ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ रस्त्यावर पाणी साचले, वाहनांना वाट काढणे कठीण

(Ask Tough Questions, Allow Government To Respond, PM Narendra Modi Tells Opposition)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI