शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट, 5-10 तारखेनंतर देशभरात थेट…, 4 आठवड्याचा हवामानाचा अंदाज आला

भारतीय हवामान खात्यानुसार, सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशातील अनेक भागांत पावसाला ब्रेक मिळेल, ज्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व आणि पूर्वोत्तर वगळता इतरत्र पाऊस कमी राहील. यामुळे बळीराजाची चिंता वाढणार असून, पुढील चार आठवडे महत्त्वाचे ठरतील.

शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट, 5-10 तारखेनंतर देशभरात थेट..., 4 आठवड्याचा हवामानाचा अंदाज आला
Monsoon Alert
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 2:58 PM

यंदा पावसाने सर्वच ठिकाणी ओढ दिली आहे. संपूर्ण देशात पाऊस जेमतेम पडला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडला, काही ठिकाणी अत्यंत कमी पडला, तर काही अतिमुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण शेतीचं नुकसान झालं आहे. आता पावसाच्या शेवटच्या महिन्यात शेतकऱ्यांवर मोठं संकट घोंघावणार आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या अनेक भागात पावसाला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरचे चारही आठवडे शेतकऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आणणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याचा चार आठवड्याचा अंदाज आला आहे. हवामानाच्या मॉडेलनुसार, पुढील दोन आठवड्यापर्यंत पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस सुरू राहिल. पण 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशातील मोठ्या भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये देशातील इतर भागात पाऊस कमी होणार आहे. यात बदल होण्याची शक्यता आहे. पण पावसाच्या मॉडेलनुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील मोठ्या भागात पाऊस कमी होणार आहे. म्हणजे देशातील अनेक भागात पावसाचे दिवस कमी होणार आहेत.

दोन आठवड्यात…

पुढच्या दोन आठवड्यात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागामध्ये देशाच्या इतर भागाच्या तुलनेत पाऊस चांगला राहील. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. याचा अर्थ असा नाही की रोजच अतिमुसळधार पाऊस होईल. वेगवेगळी हवामान स्थिती बदलल्यावर पावसाची स्थिती बदलू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पाऊस निघूनच जाईल, असं…

पावसाच्या मॉडलमध्ये 5 ते 10 सप्टेंबरच्या आसपास बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या काळानंतर देशातील मोठ्या भागात पाऊस कमी होऊ शकतो. अनेक राज्यात पावसाच्या मधील अंतर वाढू शकतं. त्यामुळे मान्सूनचा वेग कमी होईल. पाऊस कमी झाला, याचा अर्थ असा नाही की सर्वच ठिकाणी पाऊस बंद होईल. एखाद्या भागात स्थानिक हवामान सिस्टिम बनल्यानंतर पाऊस होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण देशातून पाऊस निघून जाईल, असं म्हणता येणार नाही.

पावसाची स्थिती स्पष्ट होईल…

येत्या काही आठवड्यातच पावसाची स्थिती स्पष्ट होईल. दीर्घकाळापासूनच्या पावसाच्या मॉडेलमध्ये बदलही होऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात पाऊस कमी होईल हे थेट सांगता येणार नाही. सध्या तरी अंदाज हाच आहे की येत्या दोन आठवड्यात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस सुरू राहील. त्यानंतर 5 किंवा 10 सप्टेंबनंतर देशातील अनेक भागात पाऊस कमी पडेल. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us