Maharshtra News LIVE : वाशिममध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ, गेल्या २४ तासांत होलसेल दरात ५०० रुपयांची वाढ
Maharashtra News LIVE Updates : आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती देत झाडांबाबतची माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. वृक्षतोड प्रकरणावरील याचिकेची सुनावणी 8 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त अमरावतीत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाविद्यातुन या रॅलीचा प्रारंभ होणार आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृदू संधारण, तसेच भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन 2026 – Walk for Water’ आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगलीच्या कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा मोर्चा
सांगलीच्या कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली-कुपवाड बंद ठेवण्यात आले आहे. तर सकल हिंदू समाजाचा वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून या मोरच्याला सुरवात झाली आहे. मोर्चाचा सांगली महापालिका येथे समारोप होणार आहे. त्यानंतर सभेचे आयोजन आहे. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासहित सकल हिंदू कार्यकर्ते यांची उपस्थिती आहेत.
-
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी ही जिजाऊ, सावित्री आणि अहिल्येची लेक आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
माझं भाग्य आहे की मला भिडे वाडा स्मारक शिल्पाचं लोकार्पण करण्याचं भाग्य मिळालं आहे. आज विद्यापीठात येताना मनापासून आनंद झाला, खूप दिवसाने मी विद्यापीठात आले. ज्यावेळी मी विद्यापीठात कमिटीवर होतो तो वेळ गोल्डन पीरियड होता. शेवटी लावलेल्या आरशात पाहिल्यावर मलाही प्रश्न पडला मी कोण आहे.? मग मनातून एक आवाज आला की मी सावित्रीची लेक आहे.या महामानवांच्या विचारांचा अजित दादांनी अवलंब केला. भिडे वाड्याचे स्मारकही दादांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी ही जिजाऊ, सावित्री आणि अहिल्येची लेक आहे असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भिडे वाडा स्मारकाचे उद्घाटन करताना म्हटले आहे.
-
-
वाशिममध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ, गेल्या २४ तासांत होलसेल दरात ५०० रुपयांची वाढ
वाशिममध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत होलसेल दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचा ठोक दर ७ हजार ८०० रुपये क्विंटलवर पोहचला आहे. किरकोळ बाजारात साखर ८० ते ८२ रुपये किलो झाली आहे. २५ दिवसांपूर्वी होलसेल दर ४ हजार ४०० रुपये होते, मात्र आता ४८ तासांपूर्वी हेच दर ५ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहेत. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दरवाढीमुळे गृहिणींनी चिंता व्यक्त केली असून साखरेचे दर कमी करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.
-
बीएमसीच्या सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गोंधळ
बीएमसीच्या सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गोंधळ पहायला मिळाला. जनसंपर्क विभागाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरातीवरून जोरदार वाद झाला. किशोरी पेडणेकर बोलत असताना सभागृहात मोठा गोंधळ झाला.
-
आयपीएलमध्ये जशी बोली लावतात तशी परीक्षेची बोली लावा म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही – अभिजीत दीपके.
छत्रपती संभाजीनगर : मागच्या एक-दीड वर्षापासून जेवढ्या परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये अडचण आली आहे. आयपीएल मध्ये जशी बोली लावतात तशी परीक्षेची बोली लावा म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही असं म्हणत अभिजीत दीपके यांनी टीकास्त्र सोडलं.
-
-
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल 5 तासांपासून राहुल गांधी ठिय्या देऊन बसले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात FIRदाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
-
उद्योगमंत्र्यांनी नाव न घेतल्याने जळगावात भाजपचा आमदार नाराज
जळगावातील जिल्हा उद्योग गुंतवणूक परिषदेत भाषण करताना भाजपा आमदार सुरेश भोळेंनी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला . फोनवर बोलताना उदय सामंत यांनी मंत्री गुलाबराव पाटलाचे नाव घेतले,आमदाराचं नावं न घेतल्याने भाजप आमदार झाले नाराज.
आम्ही देखील अधिवेशनात विषय मांडले, आपण महायुतीत आहोत, दोघांची नावं घेतली असती तर बर वाटल असतं, अस म्हणत आमदार सुरेश भोळे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
-
कल्याण – तिकीट विचारताच आरोपी पसार; बॅगेतून 12 किलो गांजा जप्त
कल्याण रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. तिकीट विचारताच एक इसम पसार झाला, मात्र मागे राहिलेल्या बॅगेतून 12 किलो गांजा जप्त करण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
टीसीने तिकीटाची मागणी करताच दोन तरुणांनी दंड भरून येतो असे सांगत बॅगा त्याच्याकडे ठेवल्या. बराच वेळ उलटूनही दोघे परत न आल्याने संशय निर्माण झाला. त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यामधून तब्बल 12 किलो गांजा आढळून आला.
-
गडचिरोली – जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या बॅगेतून निघाला विषारी साप, एकच खळबळ
गडचिरोली – रामाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या बॅगेतून विषारी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. रजनी शेंद्रे या विद्यार्थिनींच्या बॅगमध्ये विषारी साप शिरला होता. बॅगेतून साप निघाल्याने भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्ग सोडून बाहेर पळ काढला. अखेर शाळेतील कर्मचाऱ्यांनी या सापाला मारलं.
-
जालना : परतूर शहरात शाळकरी विद्यार्थीनींचे ठिय्या आंदोलन
कधी बस थांबत नाही आणि थांबली तरी बसमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्याने या प्रकाराला कंटाळून परतुर शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीनी संतापल्याचं पहायला मिळालं. आज परतूर शहरात मुलींनी चक्क मानव विकास मिशन योजनेची बस अडवून त्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. परतूर आगाराने मानव विकास मिशन योजनेच्या बसेसचे योग्य नियोजन करून फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आज करण्यात आली.
-
ठाणे : आरटीओकडून रिक्षा चालकांविरोधात कारवाईला सुरुवात
ठाणे स्थानक परिसरात आरटीओकडून रिक्षा चालकांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. आरटीओ पथकाच्या कारवाईच्या धसक्यामुळे अनेक रिक्षा चालक ठाणे स्थानक परिसरात कमी प्रमाणात दिसून येत आहेत. आता पर्यंत 37 रिक्षा चालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
-
नागपूर : डागा रुग्णालयातून 1 दिवसाच्या चिमुकलीला पळवले
नागपूरच्या डागा रुग्णालयातून 1 दिवसाच्या चिमुकलीला पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बुरखा घातलेल्या महिलेने बाळाला कापडात गुंडाळून पळ काढल्याचे CCTV मधून समोर आले आहे. आता CCTV च्या माध्यमातून पोलीस बुरखा घातलेल्या महिलेचा शोध घेत आहेत. डागा रुग्णालयाच्या वॉर्डातून 1 दिवसाच्या बाळाची चोरी केल्याचा प्रकाराने रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
-
जळगाव : वाकडी गावात जादूटोण्याच्या प्रकाराने खळबळ
चाळीसगाव तालुक्यातील वाकडीत जादूटोण्याच्या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे. बारावीच्या एका विद्यार्थिनीवर मागील काही दिवसांपासून जादूटोणा केला जात असल्याचा संशय आहे. आज तर विद्यार्थिनीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. घराबाहेर रांगोळी, लिंबू-मिरची फेकण्याचे प्रकार सुरू आहेत.
-
पंतप्रधान मोदी तरुणांच्या प्रश्नांवर संवेदनशील; प्रफुल्ल पटेलांचा राहुल गांधींच्या आंदोलनावर टोला
राहुल गांधी यांच्या दिल्लीतील आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; आपण एका स्वतंत्र भारतात राहतो आणि लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. जिथपर्यंत तरुणांचा आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्नांचा संबंध आहे, पंतप्रधान मोदी या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि ते अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी आपल्या तरुणांच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली आहेत. अगदी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काही छोटी गोष्ट नव्हती.”
-
“पोलिसांच्या नकारामुळेच धरणे आंदोलनाला बसावे लागले”; काँग्रेस नेते हरीश रावत यांचे वक्तव्य
काँग्रेस नेते हरीश रावत यांनी सांगितलं की, “मला राहुल गांधींचे कौतुक करायचे आहे; ते स्वतः पोलीस ठाण्यात गेले… त्यांनी नक्कीच विनंती केली असेल, पण पोलिसांच्या नेहमीच्या वर्तणुकीनुसार त्यांनी नकार दिला असावा, म्हणूनच राहुल गांधींना तिथे धरणे आंदोलनाला बसावे लागले.”
#WATCH | Delhi | Congress leader Harish Rawat says, “Rahul Gandhi has taken a solemn pledge to fight against injustice wherever it occurs. A young man is facing injustice and is trying to file an FIR. To the best of my knowledge, he has even gone to the station twice to do so,… pic.twitter.com/xyrHFs1aiC
— ANI (@ANI) August 21, 2026
-
प्रसिद्धीसाठी काही पण..! केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधीवर टीका करत सांगितलं की, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी यांनी आज जे सवंग आणि प्रसिद्धीलोलुप राजकारण करत आहेत, ते संपूर्ण देश पुन्हा एकदा पाहत आहे. राहुल गांधी यांचे आजचे धरणे आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठी नाही किंवा न्यायासाठीही नाही; हे तर काँग्रेस पक्षाच्या राजकीय हताशतेचे आणि राहुल गांधी यांच्या मीडियाच्या लक्ष वेधून घेण्याच्या भुकेचे प्रतीक आहे.
#WATCH | Delhi: Union Minister JP Nadda says, “The entire nation is once again witnessing the kind of cheap, attention-seeking politics that Rahul Gandhi displayed today outside the Sansad Marg police station. Rahul Gandhi’s sit-in protest today is neither for the students nor… pic.twitter.com/6yOWyKcHyg
— ANI (@ANI) August 21, 2026
-
पेलेट गन प्रकरणावरून रणदीप सुरजेवालांचा भाजपला सवाल
काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, “देशाचे सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की, भाजपचे लोक साहिल आणि त्याच्या आईला मुस्लिम म्हणून पेलेट गन प्रकरणावरून हिंदू-मुस्लिम अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला भाजपच्या लोकांना विचारायचे आहे की, साहिल हा हरियाणातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हे त्यांना माहीत आहे का?… देशाची परिस्थिती पहा, जिथे एका एफआयआरसाठी विरोधी पक्षनेत्याला स्वतः पार्लमेंट स्ट्रीटवर यावे लागले, तरीही एफआयआर नोंदवला गेला नाही.”
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद रणदीप सुरजेवाला ने कहा, “देश का सबसे बड़ा दु्र्भाग्य है कि भाजपा के लोग साहिल और उनकी मां को मुस्लिम बताकर हिंदू-मुस्लिम का बंटवारा पैलेट गन पर भी करने की कोशिश कर रहे हैं। मैं भाजपा के लोगों से पूछना चाहता हूं कि क्या भाजपा के लोग जानते हैं कि साहिल… pic.twitter.com/zTBi6816yU
— ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2026
-
एफआयआर दाखल करा आणि तुमचा नंबर द्या, आम्ही निघून जातो: रमेश
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “राहुल गांधी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीटवर आंदोलन करत बसले आहेत. 20 जुलै रोजी साहिलवर बेकायदेशीर पोलीस कारवाई करण्यात आली. त्याच्यावर पेलेट गनने हल्ला करण्यात आला. त्याच्या शरीरावर अनेक व्रण आहेत. साहिल त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत आहे. आमची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आमची मागणी स्पष्ट आहे: एफआयआर दाखल करा आणि नोंदणी क्रमांक द्या, मग आम्ही निघून जाऊ.”
VIDEO | Delhi: Congress leader Jairam Ramesh on Rahul Gandhi’s dharna at the Parliament Street police station seeking the registration of an FIR over pellet injuries suffered by a youth during the CJP-led July 20 protest, says, “The Leader of Opposition in the Lok Sabha and other… pic.twitter.com/1UKBFWzkdM
— Press Trust of India (@PTI_News) August 21, 2026
-
राहुल गांधी फक्त नाटक करू शकतात : गिरीराज सिंह
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत सांगितलं की, खुद्द सर्वोच्च न्यायालय एक समिती स्थापन करत आहे आणि त्यानंतर राहुल गांधी पोलीस ठाण्यात आणि डीसीपींच्या कार्यालयात जाऊन नाटक करतात, ही गोष्ट देशातील जनतेला माहीत आहे. राहुल गांधी फक्त नाटकच करू शकतात.
-
पुणे पालिकेच्या निधीच्या वादावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक
पुणे महानगरपालिकेत निधीच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक निधी परत देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्याने नाराजी आहे.
-
राहुल गांधी पुण्यात भाषण करायला येताहेत, त्याला अटी शर्ती- सुप्रिया सुळे
राहुल गांधी पुण्यात त्यांच्या कार्यक्रमासाठी येत असतील तर त्यात गैर काय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सत्याचा आवाज दाबू नका, अशी विनंतीही त्यांनी पुणे प्रशासनाला केली आहे. राहुल गांधई पुण्यात भाषण करायला येत आहेत, त्याला अटी शर्ती लावल्याची टीकाही त्यांनी केली.
-
राहुल गांधी नौटंकी करत आहेत, मंत्री बावनकुळे यांची घणाघाती टीका
राहुल गांधी यांचं दिल्लीत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. पॅलेट गन वापरल्याप्रकरणी एफआयर नोंदवण्याची मागणी करत आहे. मात्र हे आंदोलन नौटंकी असल्याचं आरोप मंत्री बावनकुळे यांनी केला आहे. काही तरी मुद्दा हाती लागावा म्हणून केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी राहुल गांधींवर केली.
-
नवी मुंबई पालिका महासभेत सेनेचे नगरसेवक काळे जॅकेट घालून आले
नवी मुंबई पालिका महासभेत सेनेचे नगरसेवक काळे जॅकेट घालून आले आहेत. महापौरांना काही वेळासाठी सभा तहकूब केली.
-
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरून मुंबई भाजपाचा आरोप
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरून मुंबई भाजपाने आरोप केला आहे. गर्दीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सना 25 हजारांची ऑफर होती, असा आरोप त्यांनी केला आहे. व्हिडिओ ट्वीट करून मुंबई भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢 𝐂𝐚𝐮𝐠𝐡𝐭 𝐢𝐧 𝟒𝐊 !
Reports of influencers being offered ₹25,000 just to attend @RahulGandhi ‘s event in Pune expose the reality behind the hype. Genuine public support cannot be manufactured through paid PR stunts and influencer marketing. pic.twitter.com/EfLA8ySTe3
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) August 21, 2026
-
निवडणुकीत भाजपाची गुंडागर्दी संपवून टाकू- दीपके
जयपूरच्या रामपुरा गावात सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जयपूरमध्ये सीजेपीच्या आशुतोष रांका यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी अभिजीत दीपके यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.निवडणुकीत भाजपाची गुंडागर्दी संपवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी राजस्थानमध्ये जाणार असंही अभिजीत दीपके यांनी सांगितलं आहे.
-
“7 पानांची तक्रार देऊनही दिल्ली पोलिसांकडून FIR नाही”; पीडित साहिलचा आरोप
पेलेट गन हल्ल्यातील पीडित साहिल लोचव याने सांगितलं की, “20 जुलै रोजी माझ्यावर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला. मला लेडी हार्डिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून मला एम्समध्ये पाठवण्यात आले. एम्समध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु, माझ्या डोळ्याची दृष्टी अजूनही स्पष्ट झालेली नाही. 14 ऑगस्ट रोजी, मी सात पानांची तक्रार लिहून माझ्या वकिलांकडे दिली होती. परंतु, अद्याप एफआयआर नोंदवला गेला नाही.”
#WATCH | Delhi: At Parliament Street Police Station, pellet gun shelling victim Sahil Lochav says, “On 20th July, pellet guns were fired at me. I was admitted to Lady Hardinge, from there, I was referred to AIIMS. I underwent surgery at AIIMS. But the vision in my eye is still… pic.twitter.com/qbU1p2oaxZ
— ANI (@ANI) August 21, 2026
-
“तक्रारीवर फक्त शिक्का मारला, FIR अजूनही नाही”; पीडित साहिलच्या वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप
साहिल लोचव यांचे वकील यांनी सांगितलं की, ‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी येथे आल्यानंतर, तक्रारीवर केवळ शिक्का मारण्यात आला आहे, परंतु अद्याप एफआयआर नोंदवला जात नाही आहे. हा उघडपणे घडलेला गुन्हा आहे. आमच्याकडे लेडी हार्डिंग रुग्णालयाची एमएलसी प्रत आहे, ज्यामध्ये शरीरावर जखमा झाल्याचे आणि रक्तस्त्राव होत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.’
#WATCH | Delhi: At Parliament Street Police Station, pellet gun shelling victim Sahil Lochav’s lawyer says, “On 14th August we went to the Police Station in Connaught Place. They said that all Jantar Mantar cases have come to Parliament Street Police Station. We came here. They… pic.twitter.com/Z6Mm7vGb1F
— ANI (@ANI) August 21, 2026
-
“राहुल गांधी अराजकतेचे राजकारण करत आहेत”; भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांचा घणाघात
भाजप खासदार रवी शंकर प्रसाद म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अराजकतेचे राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या ते कोणत्याही परवानगीशिवाय किंवा पूर्वसूचनेशिवाय पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात धरणे आंदोलनाला बसले आहेत. ते ज्या घटनेचा उल्लेख करत आहेत, त्याबाबत आधीच एफआयआर नोंदवण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याच्या तपासासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.’
#WATCH | BJP MP Ravi Shankar Prasad says, “It is very unfortunate that LoP Rahul Gandhi does politics of anarchy. Currently, he is sitting on dharna at Parliament Street PS without permission or prior information. The police have informed him that an FIR has already been… pic.twitter.com/23kNqyxeQi
— ANI (@ANI) August 21, 2026
-
पॅलेट गनने याला आंधळं बनवलय, फक्त FIR पाहिजे, त्याशिवाय नाही हलणार राहुल गांधी मागणीवर ठाम
छर्रे साहिलच्या शरीरातून काढले. डोळ्यातून तीन काढले. याला दिसणार नाही. याला आंधळं बनवलय. आम्ही फक्त एफआयआर मागत आहोत. बाकी काही नाही असं राहुल गांधी म्हणाले. कोणीतरी पॅलेट गन चालवली ते शोधून तर काढा. एफआयआर झाली पाहिजे. भारतीय नागरिक आहे असं राहुल म्हणाले.
-
बीडमध्ये विलास घुले हत्याप्रकरणी मोर्चा, सोनवणेंच्या मुलाच्या अटकेची मागणी
बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. खासदार सोनवणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.सोनवणेंचा मुलगा गुन्हेगार असून त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
-
“जोपर्यंत FIR नोंदवला जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही”- राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ’20 जुलै रोजी कनॉट प्लेस येथे पेलेट गन वापरण्यात आली. एम्सच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, त्याच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत आणि 3 छर्रे त्याच्या डोळ्यात आहेत. त्या डोळ्याची दृष्टी त्याने गमावली आहे. त्याच्या हृदयाजवळही काही छर्रे आहेत ज्यांना स्पर्श करता येऊ शकत नाही. दिल्ली पोलीस म्हणत आहेत की त्यांनी पेलेट गन चालवली नाही. मग, येथे फक्त एकच प्रश्न उपस्थित होतो: कोणीतरी तर हे केलेच असेल. गुन्हासुद्धा घडला आहे. आम्ही मागणी करत आहोत की एफआयआर नोंदवला जावा.’
#WATCH | Delhi: At Parliament Street Police Station, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, “Pellet gun was used at Connaught Place on 20th July. AIIMS report clearly says that there are more than 200 shells inside his body and 3 in his eye. He has lost vision in that eye. There are… pic.twitter.com/kH0WGVMuBa
— ANI (@ANI) August 21, 2026
-
साहिल या युवकावर पॅलेट गनमधून गोळीबार
साहिल या युवकावर पॅलेट गनमधून गोळीबार झाला. त्याचे वकिलही राहुल गांधींसोबत होते. पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नव्हते त्याची माहिती साहिलच्या वकिलांनी मीडियाला दिली.
-
तपास अधिकाऱ्याचं नाव आम्हाला सांगा, आम्ही इथून निघून जाऊ
तपास अधिकाऱ्याचं नाव आम्हाला सांगा, आम्ही इथून निघून जाऊ. या कुटुंबासाठी न्याय मागत आहोत. आम्हाला सांगितल जातय, हिंदुस्थानात युवावर गोळी चालवली जाऊ शकते. पण या देशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्ली पोलीस न्याय देणार नाहीत. आज सकाळी एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे होऊ शकत नाही, म्हणून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं असं राहुल गांधी म्हणाले.
-
प्लीज FIR दाखल करा, तो पर्यंत इथून हलणारच नाही, राहुल गांधी ठणकावून सांगितलं
FIR दाखल करा एवढचं आम्ही सांगत आहोत. प्लीज एफआयआर दाखल करा. आतमधून आम्हाला सांगितलं जातय वरुन ऑर्डर आलीय एफआयआर दाखल होऊ शकत नाही. एफआयआर दाखल होणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही. एफआयआर दाखल करावाच लागेल. लाखो महिलांवर अन्याय होतो, गरीबांवर अन्याय होतो असं राहुल गांधी म्हणाले.
-
राहुल गांधी पोलीस स्थानकात, पॅलेट गन चालवल्याचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. सीजेपीच्या संसद मार्चमध्ये पॅलेट गन चालवल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. जंतरमंतरवरील जखमी आंदोलक विद्यार्थी राहुल गांधींसोबत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राहुल गांधी केली आहे. पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
भाजपकडून अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार… बालवडकरांची वर्तवणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी व्यक्त… तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका…
-
2014मध्ये मविआ स्थापन करण्याचा प्रस्ताव होता- चव्हाण
मविआ म्हणून सत्ता स्थापन करण्याचा 2014 लाच प्रस्ताव आला होता… मात्र त्यावेळी मी तो नाकारला… पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट… 2019मध्ये मीच प्रस्ताव पुढे केल्याचा चव्हाणांचा दावा…
-
मुंबई – पार्थ पवार यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही
पार्थ पवार आणि शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही… अशी माहिती पवारांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यानं दिलीय… दोघांच्या भेटीत फक्त कौटुंबिक चर्चा झाली, आम्ही NDAसोबत जाणार नाही, अशी कोणतीच चर्चा नाही… असंही या नेत्यानं म्हटलंय….
-
हिंगोलीत सत्ताधारी आमदारांचाही शक्तिपीठ महामार्गाला विरोध
हिंगोलीत सत्ताधारी आमदारांचाही शक्तिपीठ महामार्गाला विरोध. जमीन मोजणी प्रक्रिया आमदार चंद्रकांत नवघरेंनी बंद पाडली. वाघी-शिंगी शिवारात जमीन मोजणी प्रकिया बंद पाडली. बांगरांनंतर आमदार नवघरेंचाही शक्तिपीठ महामार्गाला विरोध
-
गुन्हा दाखल होईपर्यंत इथून हलणार नाही
गुन्हा दाखल होईपर्यंत इथून हलणार नाही, राहुल गांधी यांची भूमिका. cjp च्या संसद मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्याचा राहुल गांधी यांचा आरोप.
-
पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. जंतरमंतरवरील जखमी विद्यार्थी राहुल गांधींसोबत आहे.
-
संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी यांचा ठिय्या
काँग्रेस नेते राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण कुठवर आलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात आले.
-
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून चित्रा वाघ यांचा विरोधकांवर निशाणा
अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा; मात्र राहुल गांधी आणि विरोधकांकडून दुटप्पीपणा होत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. झारखंडमधील आंदोलनावर राहुल गांधींनी भूमिका घेतली नाही, दिल्लीच्या जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनाचा राजकारणासाठी वापर केला, असंही त्यांनी म्हटलंय.
-
खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला
खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
नालासोपाऱ्यात महिलांमध्ये फिल्मी स्टाइल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
नालासोपाऱ्यात महिलांमध्ये फिल्मी स्टाइल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या महिला या इन्स्टाग्राम क्रिएटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील ओस्तवाल नगरी, नवजीवन स्कूलजवळ हा प्रकार घडला असल्याचे समोर आलं आहे. महिलांचा झालेला वाद इतका विकोपाला गेला की, दोघींमध्ये थेट एकमेकींचे केस धरून, हाणामारी झाल्याचं व्हिडिओवरून दिसत आहे.
-
कुंभमेळ्याच्या कामातून फक्त पैसे खाण्याचा विषय- पृथ्वीराज चव्हाण
“कुंभमेळ्याच्या कामातून फक्त पैसे खाण्याचा विषय सुरू आहे. नाशिकचे नवे पालकमंत्री मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत आहेत. महाजनांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचं बजेट, हे आश्चर्यकारक आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
-
शेतकऱ्यांनंतर आता सत्ताधारी आमदारांचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध
हिंगोली- शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनंतर आता सत्ताधारी आमदारांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी प्रक्रिया आमदार चंद्रकांत नवघरे यांनी बंद पाडली. आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यासह शक्तिपीठबाधित महामार्ग शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली. वसमत विधानसभेतील वाघी/शिंगी शिवारात जमिन मोजणी प्रकिया बंद पाडली. आमदार बांगर यांच्यानंतर आता आमदार नवघरे यांनीही शक्ती पीठ महामार्गाची जमिन मोजणी प्रक्रिया बंद पाडली आहे.
-
विदर्भातील आजी- माजी आदिवासी आमदार, खासदारांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक
विदर्भातील आजी- माजी आदिवासी आमदार, खासदारांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आज दुपारी दोन वाजता रवि भवन येथे ही बैठक होणार असून, या बैठकीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-
शाळा इमारतीचा प्रश्न अडकला श्रेयवादात, वाशिममध्ये विद्यार्थ्यांचे हाल
वाशिम तालुक्यातील काटा गावात जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत मागील दोन ते तीन वर्षांपासून तयार आहे. मात्र अद्याप ती शाळेच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. वापराविना पडलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून परिसरात गवत वाढले आहे. दुसरीकडे विद्यार्थी जुन्या जीर्ण इमारतीत शिक्षण घेत आहेत. राजकीय श्रेयवाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न रखडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
-
ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या ३७ रिक्षाचालकांना आरटीओची नोटीस
प्रादेशिक परिवहन विभागाने ठाण्यात धडक कारवाई करत मराठी भाषा न बोलू शकणाऱ्या ३७ रिक्षाचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १२ अधिकाऱ्यांच्या ६ विशेष पथकांनी ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, माजिवडा, खोपट, कळवा आणि भिवंडी परिसरात मोहीम राबवून सुमारे ४५० वाहनांची तपासणी केली.
-
नागपुरातील काटोल नाका चौकातील खड्डा पोलिसांनी बुजवला.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत घटनास्थळी उपलब्ध साहित्याच्या मदतीने खड्डा बुजवला. पोलिसांच्या या तत्परतेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अद्यापही खड्ड्यांची समस्या कायम आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी खड्डा बुजवल्याने प्रशासनाच्या कामातील दिरंगाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
-
विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी विराट मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही केले इन्स्टॉल. मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होणार असल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती. दहा वाजता छत्रपती क्रीडा संकुलापासून मोर्चाला होणार सुरुवात.
-
पावसाचा खंड वाढल्याने पिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड
कपाशीच्या पिकाला डब्याने पाणी देत पीक संरक्षित करण्याचे प्रयत्न. १५ ते २० दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांना पाण्याचा ताण. दुपारच्या उन्हात कपाशीच पिक टाकते मान. शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्न. शेतात ड्रम मध्ये पाणी भरून डब्याच्या साहाय्याने पिकांना पाणी
-
कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली आणि कुपवाड बंद
सांगलीच्या कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली आणि कुपवाड बंद ठेवण्यात आले आहे. तर सकल हिंदू समाजाचा वतीने 4 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासाहित सकल हिंदू कार्यकर्ते उपस्थिती राहणार आहेत.
-
जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेड्यातील ३५ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी…
१५ दिवसांत मोजणी प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे निर्देश. आठ दिवसापासून 35 कुटुंबाचे जळगावातील शिवतीर्थ मैदानावर सुरू होते आमरण उपोषण. जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चेनंतर मोजणी प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे
-
पुण्यात भाजपा दादा गट NCP चा वाद
दोन्ही नगरसेवकांचा विकासनिधी शुन्यावर अमोल बालवडकर आणि सुनील टिंगरे यांच्या प्रभागाला विकास निधी शून्य करण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार
-
कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले
कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले आहेत, ज्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा अडथळा, यादीतील शेतकरी मयत असल्याने अनेक कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहेत. मयत कर्जदारांच्या वारसांची बँकेत नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी बँकांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ
नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 32.2 अंश सेल्सिअस वर गेला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या 24 तासात 3.8 अंश सेल्सिअसने पारा वाढला आहे, हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते. गेल्या दोन आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे. पुढील सात ते आठ दिवस पावसाची श्यक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
अमरावतीत आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरण
15 ऑगस्टच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने व महर्षी शाळेच्या हलगर्जीपणामुळे राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर पाच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले… यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून महर्षी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. महर्षी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून महर्षी शाळेच्या हलगर्जीपणा समोर आला.
-
अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच…
अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच आहे. शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रात्र उघड्यावरच जागून काढली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. अमरावती मधील महर्षी शाळेत अकरावी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्यांचा मृत्यूप्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोषमनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे..
-
दहिसर – गांजा शेती पर्दाफाश – अल्पवयीनाकडून महिलेवर चाकू हल्ला
मुंबईच्या दहिसरमध्ये गांजा शेतीचा पर्दाफाश करणाऱ्या अल्पवयीन मुलाला धमकावणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बोरीवली MHB पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक 4 मध्ये रात्री 9 च्या सुमारास सुमन ठाकूर या महिलेवर एका अल्पवयीनाने चाकूने वार केले. काही दिवसांपूर्वी या परिसरात घरात गांजा शेतीचा प्रकार उघड झाला होता. त्याच प्रकरणाशी संबंधित असल्याने महिलेने अल्पवयीनाला धमकावले होते. रागाच्या भरात अल्पवयीनाने हल्ला केला आणि स्वतःचा व्हिडिओ बनवून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथील आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक मारली. दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. निखिल आणि कपिल आरके या भावांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. बीडचे रहिवासी असलेले दोन्ही भाऊ कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वी संभाजीनगरात आले होते. कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी सिडको पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Published On - Aug 21,2026 8:25 AM
