AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर..

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झाली. जोरदार आंदोलन केले जात आहे. त्यातच रात्री उशिरा पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. ज्यानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली.

मुंबईत काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर..
Rahul Gandhi
| Updated on: Oct 07, 2026 | 7:44 AM
Share

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मुंबईत राजकारण तापले. मध्यरात्री वांद्रे रिक्लमेशन येथे युवक काँग्रेसचे आंदोलन केले.पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध आंदोलन करत असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आकाशवाणी भवनजवळ दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या घटनेचे पडसाद आर्थिक राजधानी मुंबईत उमटले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष जीनत सबरीनच्या नेतृत्वात मुंबईच्या वांद्रे रिक्लमेशन परिसरात मध्यरात्री जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला अधिकारी वांद्रे रिक्लमेशन उड्डाणपुलाखाली जमले. त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कृतींना असंवैधानिक आणि हुकूमशाही ठरवत घोषणाबाजी केली.

हातात फलक घेऊन आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि आपला निषेध नोंदवला. अचानक झालेल्या रस्त्यावरील आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक मोठी तुकडी घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करून शांत होण्याचे आवाहन केले, परंतु कार्यकर्त्यांचा संताप काही कमी झाला नाही.

त्यानंतर, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी महिला कार्यकर्त्यांसह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीची औपचारिक प्रक्रिया आणि आवश्यक कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरा सर्व आंदोलकांना सोडण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ कल्याणात युवक काँग्रेस आक्रमक.

कल्याण रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल रोकोचा प्रयत्न. घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला असून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपला इशारा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि कथित मतचोरीच्या विरोधात दिल्लीत काँग्रेसकडून 9 तासांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. याचे पडसाद कल्याणमध्ये उमटले असून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?