AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ, थेट आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, गुन्हा दाखल करत..

मनोज जरांगे पाटील यांच्या समस्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. दोन महिला जरांगेंची तक्रार करण्यासाठी थेट मुंबईत पोहोचल्या. जरांगेंच्या विरोधात बोलल्याने आपल्याला कशाप्रकारचा त्रास दिला जात आहे, हे महिलांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ, थेट आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, गुन्हा दाखल करत..
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 07, 2026 | 8:01 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप केली जात आहेत. ललिता तारक यांनी आरोप केले. हेच नाही तर त्यांनी पोलिसात तक्रारही दिली. आता जरांगेंच्या अडचणीत चांगलीच मोठी वाढ होताना दिसतंय. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रेखा कोंडे यांनी नुकताच म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचा प्रश्न 2023 पासून मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता पण आझाद मैदानाच्या आंदोलनंतर माझा त्यांच्यावरचा विश्वास उडाला होता आणि आता तर त्यांनी पाटोद्यात आंदोलन गुंडाळलं होत आणि त्यांना विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागणीच्या पत्राची मागणी मी केली होती. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी मला माझा चरित्र हनन केले आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून बलात्काराच्या धमक्या देऊन आमची बदनामी केली आहे.

यासंदर्भात आम्ही वेळोवेळी अनेक तक्रारी दाखल केल्या पण गुन्हा काही त्यांच्यावर नोंद होत नव्हता. त्यामुळे आम्ही मंत्रालयात आलो आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना आमची व्यथा सांगितली आणि आमच्या मागणीच पत्र दिला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला यासंदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची फसवणूक केली आहे आणि त्यांना आता एकही प्रश्नाच उत्तर देता येत नाही. ललिता तारक अंतरवाली सराटी या मागील काही दिवसांपासून जरांगेंवर आरोप करत आहेत. त्यांनी म्हटले की, मी आंतरवाली सराटी येथे राहते जिथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असतात. पण त्यांनी आता जे पाटोद्यात आंदोलन मागे घेतल यासंदर्भात मी काही प्रश्न उपस्थित केले आणि या पाटोद्याच्या आंदोलनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमधील आंदोलनाचा स्टेज काढण्याचा निर्णय घेतला.

यावर आम्ही प्रश्न उपस्थित केले तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी खालच्या भाषेत माझ्यावर कमेंट केल्या आणि चारित्र्य हनन केल आहे. यासंदर्भात आम्ही मंत्रालयात आलो. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मी तुमची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मला तुम्ही न्याय द्या अशी मागणी केली.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?