AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन, जरांगे पाटील संतापले, पुण्यातून मोठा इशारा

एमपीएससीच्या अध्यक्षाच्या राजीनाम्यासाठी तसेच आपल्या इतर काही मागण्यांसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, आज या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आहे.

एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन, जरांगे पाटील संतापले, पुण्यातून मोठा इशारा
Manoj Jarange Patil Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 10:04 PM
Share

एमपीएससीच्या अध्यक्षाच्या राजीनाम्यासाठी तसेच आपल्या इतर काही मागण्यांसाठी पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  तुमच्यासाठी सगळा महाराष्ट्र बंद करू असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

महाराष्ट्रमध्ये जे जे कायं होतंय. ते तरुणांच्या हिताचं होतंय. माझं पुण्यनगरीतून सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन आहे, तुम्हाला थोडाही कलंक लागू नये, तुमचे आई-वडील तुमची घरी वाट पहात आहेत.  मुलाला नोकरी मिळाली तर कितीही दुष्काळचं संकट आलं तरी काही फरक पडणार नाही. यांना मस्ती आली आहे, तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करतो, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच हे आंदोलन राजकीय कसं काय? विद्यार्थ्यांना बळ दिलं नाही पाहिजे का? असा सवालही यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मला सकाळपासून फोन चालू आहेत, तिकडे जाऊ नको. मला कायं विकत घेतलं की कायं तुम्ही. कशालाही फोन करता.  मी डोक्यावर घेतले होते. आपले आपले म्हणून.  मी जर जातीवादी असतो तर इकडे आलो नसतो. राजीनामा द्यावाच लागेल, काय नाव ठेवलं तर भीमनवार नाव पाट करता करता मला दोन दिवस लागले असं म्हणत त्यांनी यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस तुम्ही त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करता का? सरकारने त्यांना एक दिवसात काढून टाकावे, आहे गरीबाचा पण एकटा लढतो. महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलून टाकीन, गरीबाची मुलं अधिकारी होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही गरिबांच्या आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा करत आहात, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर