सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता

| Updated on: Jun 04, 2021 | 11:00 PM

केंद्र सरकारने काही अटीशर्थींसह पुण्यातील हडपसर इथल्या प्रकल्पात सीरमला Sputnik V लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता
सीरम इन्स्टिट्यूट स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन घेणार
Follow us on

मुंबई : कोरोना लसीकरणाबाबात एक दिलासादायक बातमी आहे. Sputnik V कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वी या लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने काही अटीशर्थींसह पुण्यातील हडपसर इथल्या प्रकल्पात सीरमला Sputnik V लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सीरमने या लसीच्या उत्पादनासाठी रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसह करार केला आहे. (Serum Institute will produce Sputnik V vaccine, permission from DGCI)

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार औषध नियामक मंडळाने सीरम इन्स्टिट्यूटला भारतात Sputnik V लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सीरमने स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरममार्फत सद्या कोविशील्ड लसीचं उत्पादन सुरु आहे. रशियाच्या Sputnik V या लसीचं उप्तादन भारतात सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करत आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी त्याची किंमत जाहीर केली आहे. स्पुटनिक व्हीची किंमत 948 रुपये आणि 5 टक्के जीएसटी असेल. अशा प्रकारे, एका डोसची किंमत 995.40 रुपये आहे.

सीरम नोवावॅक्स लस बनवणार

सीरमकडून नोवावॅक्स लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये डीसीजीआयनं यासाठी आपत्कालीन परावनगी दिलेली आहे.

Sputnik V लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात

Sputnik V लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात देखील झाली आहे. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज Sputnik V लसीचं वितरण करत आहे. भारतात Sputnik Vलसीचं उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याचं रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड आणि भारतातील औषध निर्माता कंपनी पॅनेशिया बायोटेकनं संयुक्तरित्या जाहीर केलं आहे.

पॅनेशिया बायोटेक स्पुतनिक वीचे 10 कोटी डोस बनवणार

भारतीय औषध निर्माती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुतनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आळी आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक वी लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत 10 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं.

संबंधित बातम्या :

रशियात सिंगल डोसवाल्या ‘स्फुटनिक लाईट’ कोरोना लसीच्या वापराला मंजुरी, 80 टक्के परिणामकारकता असल्याचा दावा

Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?

Serum Institute will produce Sputnik V vaccine, permission from DGCI