रशियात सिंगल डोसवाल्या ‘स्फुटनिक लाईट’ कोरोना लसीच्या वापराला मंजुरी, 80 टक्के परिणामकारकता असल्याचा दावा

स्फुटनिक व्ही कोरोना लसीच्या सिंगल डोस व्हर्जन स्फुटनिक लाईटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. स्फुटनिकच्या निर्मात्यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे.

रशियात सिंगल डोसवाल्या 'स्फुटनिक लाईट' कोरोना लसीच्या वापराला मंजुरी, 80 टक्के परिणामकारकता असल्याचा दावा

नवी दिल्ली : रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी स्फुटनिक व्ही कोरोना लसीच्या सिंगल डोस व्हर्जन स्फुटनिक लाईटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. स्फुटनिकच्या निर्मात्यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमंट फंड (RDIF)ने लसीच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत केली होती. आरडीआयएफने केलेल्या वक्तव्यानुसार स्फुटनिक लाईट ही लस 79.4 टक्के परिणामकारक आहे. तर स्फुटनिक व्ही या लसीचे दोन डोस 91.6 टक्के परिणामकारक होते. (Russia approves use of single dose Sputnik light vaccine)

स्फुटनिकच्या ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं आहे की, स्फुटनिक लाईटच्या वापरामुळे लसीकरण वेगाने करता येईल. यामुळे कोरोना महामारीवर काहीसं नियंत्रण मिळवता येईल. दरम्यान स्फुटनिक व्ही हीच मुख्य लस असेल. मात्र, स्फुटनिक लाईट या लसीचेही स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्फुटनिक व्हीला आधीच 64 देशांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, ज्या देशांची एकूण संख्या 3.2 बिलियन पेक्षाही अधिक आहे.

रशियातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेदरम्यान अभ्यास

स्फुटनिक लाईट ही लस कोरोना महामारीविरोधात लढण्यास प्रभावी आणि विश्वसनीय व्हॅक्सिन आहे. या लसीच्या सहाय्याने वेगाने सुरक्षा मिळवली जाऊ शकते. या लसीच्या माध्यमातून कोरोना विषाणूला हरवण्यास मदत होईल आणि मोठ्या समुहाचं संरक्षण होईल. या लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तिचा वापर रशियातील लसीकरण मोहिमेदरम्यान 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 मध्ये करण्यात आला. लोकांना लस दिल्यानंतर 28 दिवसांनी त्याची माहिती गोळा करण्यात आली.

मुंबईत नियमानुसारच लसीकरण

मुंबई महापालिकेनं लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ यानुसारच लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास सामाजिक दुरीकरणाची अंमलबजावणी कठीण आहे. त्यामुळे गर्दी न करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. त्याचबरोबर आवश्यक त्या बाबींची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रांवर प्रवेश देण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. मात्र यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे सामाजिक दुरीकरण राखणं कठीण होत आहे. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणारी काळजी घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांना सुलभतेने लसीकरण करता यावे, या उद्देशाने ज्या नागरिकांची ‘कोविन ॲप’ वर नोंदणी झालेली आहे, तसेच ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जो मिळालेल्या ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत.

संबंधित बातम्या :

PHOTOS : वर्ध्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात, नितीन गडकरींकडून पाहणी

कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर! लग्न लांबलं अन् सगळं उघडं पडलं, अख्खं वऱ्हाड क्वारंटाईन

Russia approves use of single dose Sputnik light vaccine