
ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसीत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी नेपाळमध्ये लोकशाहीच्या जागी पुन्हा राजेशाही लागू करण्यची मागणी केली आहे. शंकराचार्य म्हणाले की नेपाळमध्ये जोपर्यंत राजेशाही होती तोपर्यंत कोणतीही गडबड नव्हती. चीनने प्रचंड यांनी उभे करुन नेपाळमध्ये लोकशाहीचा माहौल तयार केला, परंतू जनता आता असंतुष्ठ आहे आणि पुन्हा राजेशाहीची मागणी करत आहे.
शंकराचार्य म्हणाले की हिंदू समाजाची शासन व्यवस्था राजेशाही आहे. यामुळे जगात किमान एक जागा तरी अशी असावी जेथे वेदमंत्रांनी अभिषिक्त राजा राज्य करावा आणि संपूर्ण जगाला दाखवले जाऊ शकेल की आपल्या परंपरेने देखील कल्याण होऊ शकते.
ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावेळी भारतातही लोकशाही ऐवजी राजेशाही लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की भारतात हिंदू बहुसंख्य असूनही दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनला आहे. अल्पसंख्याकांसाठी 300 योजना सुरु आहे. आणि त्यांची प्रत्येक मागणी मान्य होत आहे.तर 100 कोटी सनातनींचे ऐकले जात नाही असेही शंकराचार्य यावेळी म्हणाले.
बिहार निवडणूकीत उतरण्याची घोषणा करताना शंकराचार्य म्हणाले की गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि गोहत्येला दंडनीय अपराध ठरवला जावे. यासाठी आपण प्रत्येक विधानसभा जागेवर अपक्ष उमेदवार उभे करणार आहोत. त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचे समर्थन केले आणि कथावाचकांवरील नियंत्रणासाठी शंकराचार्यांना अधिकार पुन्हा द्यावेत अशी मागणी केली.
नेपाळमध्ये गेले काही दिवस अराजक माजले आहे. येथे सोशल मीडिया बंदीवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारणे केले असून निदर्शकांनी प्रचंड विध्वंस केला आहे. नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी राजेशाही होती. त्यानंतर तेथे आलटून पालटून विविध पक्षाची सरकार येत होती. आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापण करण्याच्या हालचाली सुरु असून सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले आहे.