AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळबाबतच्या 10 अजब फॅक्ट्स…वाचल्यावर डोक्याची बत्तीच गुल होईल, गुपचूप जाणून घ्या सर्वकाही!

नेपाळमध्ये गेले काही दिवस गृहकलहसारखी स्थिती असून संपूर्णपणे अराजक पसरले आहे. या देशातील अनेक चालीरिती जगापेक्षा वेगळ्या आहेत. या छोट्याशा देशाची 10 जगावेगळी वैशिष्ट्य वाचाच....

नेपाळबाबतच्या 10 अजब फॅक्ट्स...वाचल्यावर डोक्याची बत्तीच गुल होईल, गुपचूप जाणून घ्या सर्वकाही!
interesting fact about nepal
| Updated on: Sep 11, 2025 | 8:49 PM
Share

Interesting Facts about Nepal: भारताचा शेजारील देश नेपाळ सध्या तरुणांच्या आंदोलनाने ( Nepal Protest) ढवळून निघाला आहे.यामुळे नेपाळच्या संदर्भातील बातम्यांना सोशल मीडियावर खंगाळून पाहिले जात आहे. नेपाळच्या लाईव्ह अपडेट्स लोक पाहात आहेत. अशात या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या देशा संदर्भात 10 फॅक्ट आहेत त्या वाचून लोक हैराण होत आहेत. नेपाळबाबत काही सामान्य माहिती तुम्हाला असेलच जसे नेपाळचा उपनाव ‘जगाचे छत्र’ ( विश्व की छत ), तेथील पर्वतमाला, एव्हरेस्ट पर्वत, भौगोलिक स्थिती आणि चालीरिती…परंतू तुम्हाला नेपाळच्या या 10 अजब गजब बाबी माहिती नसतील 99 टक्के लोकांना त्या माहिती नाहीत.. चला तर नेपाळच्या या कोणत्या रहस्यमयी गोष्टी जगापासून त्याला वेगळा सिद्ध करतात ते पाहूयात…

बुद्धाचे जन्मस्थान

नेपाळला भगवान गौतम बु्द्धाचे जन्मस्नान म्हटले जाते. सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवी सन पूर्व 623 मध्ये कपिलवस्तू लुंबिनी येथे झाला होता. लुम्बिनीला 1997 मध्ये युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून घोषीत केले आहे.

 त्रिकोणी  झेंडा

नेपाळचा झेंडा सर्वसामान्यपणे आयाताकृती असतात परंतू नेपाळ हा जगातील एकमेव देश आहे ज्याचा झेंडा दोन त्रिकोण बनून बनला आहे. दोन त्रिकोणी पताका प्रमाणे हा झेंडा आहे. वरच्या त्रिकोणात ( त्रिभूज) चंद्र आणि खालच्या त्रिकोणात सुर्याची छबी अंकीत आहे. हा झेंडा दोन प्रमुख धर्म हिंदू आणि बौद्ध धर्माचे प्रतिनिधीत्व करतो.

स्वतंत्र देश

आश्चर्य म्हणजे नेपाळची गणना त्या मोजक्या देशात केली जाते. ज्यांच्यावर कोणाही विदेशी लोकांनी कब्जा केलेला नाही. त्यामुळे नेपाळ कधी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही. नेपाळ 2008 एक संघ राज्य गणतंत्र बनला होता.

2015 मध्ये बनली घटना

बातम्यानुसार नेपाळची नवीन घटना 20 सप्टेंबर 2015 ला लागू झाली. 308 कलमे, 35 भागा आणि 9 परिशिष्ठ असलेले हे संविधान 1948 नंतर नेपाळचे सातवे संविधान आहे.

राजधानी काठमांडू: एक तलाव

नेपाळची अनोखी बाब म्हणजे देशाची राजधानी काठमांडू एकेकाळी तलाव होती. काही मान्यता नुसार या तलावाचे विभाजन त्याचे पाणी काढल्याने झाले त्यामुळे तेथील संस्कृतीला विराम लागला. तर काहींच्या मते ग्लोबल वार्मिंगमुळे हा तलाव हळूहळू सुखला.

नेपाळचा राष्ट्रीय खेळ

23 मे 2017 रोजी व्हॉली बॉल हा खेळ नेपाळचा राष्ट्रीय खेळ घोषीत झाला. याआधी येथे विटी दांडू सारखा पांरपारिक खेळ राष्ट्रीय खेळ मानला जात होता.

नेपाळची राष्ट्रीय मिठाई

तांदळाच्या पिठापासून तयार होणारी ‘योमरी’ ही नेपाळची राष्ट्रीय मिठाई आहे. या मिठाईला न्यूवार समुदायाद्वारे योमरी पूजेदिवशी तयार केले जाते.

शनिवारची सुट्टी

नेपाळ एक असा अनोखा देश आहे जेथे केवळ शनिवारी सुट्टी दिली जाते. म्हणजे रविवार ऐवजी येथे शनिवारची सुट्टी म्हणजे विकली ऑफ असतो.

एलिफंट पोलो

नेपाळच्या खेळांची यादी जास्त मोठी नाही. येथे एक खास खेळ खेळला जातो. त्यात हत्तींची सवारी करुन एलिफंट पोलो खेळला जातो. यात एक मानक पोलो बॉल आणि 1.8 ते 3 मीटरचा लांबीचा वेताची छडी असते त्यांच्या टोकाला पोलोचा मॅलेट लावलेला असतो.

गो​हत्यावर 12 वर्षांची जेल

भारतासारखी नेपाळमध्ये गोहत्या गंभीर गुन्हा आहे. येथे गोहत्या केल्यास 12 वर्षांचा तुरुंगवास होतो. बीबीसीच्या वृत्तानुसार नेपाळच्या संखुयासभा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी कोर्टाने एका 55 वर्षीय महिलेला गोहत्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.