उत्तर प्रदेशमधील निर्णयानंतर शरद पवार यांचाही लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा, वाचा काय आहेत कारणं

| Updated on: Jul 12, 2021 | 5:59 AM

मुंबई : उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर देशभरात या विषयावरुन चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणाला पाठिंबा दिलाय. आर्थिक विकास, राहणीमानाचा दर्जा उंचावणे आणि पर्यावरणीय संतुलनासाठी लोकसंख्या नियंत्रणाचा निर्णय आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय (Sharad […]

उत्तर प्रदेशमधील निर्णयानंतर शरद पवार यांचाही लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा, वाचा काय आहेत कारणं
Sharad Pawar
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर देशभरात या विषयावरुन चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणाला पाठिंबा दिलाय. आर्थिक विकास, राहणीमानाचा दर्जा उंचावणे आणि पर्यावरणीय संतुलनासाठी लोकसंख्या नियंत्रणाचा निर्णय आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय (Sharad Pawar comment on population control and UP policy).

जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. इतर पक्ष देखील लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा देतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. शरद पवार म्हणाले, “जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नागरिकांनी लोकसंख्या नियंत्रणात आपलं योगदान देण्याची शपथ खायला हवी. उत्तम देश आणि चांगलं जीवनमानासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं, “लोकसंख्या वाढल्यास काय नुकसान होतं याबद्दल प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. वाढती लोकसंख्या अनेक प्रश्नांचं मूळ आहे. यामुळे समाजात विषमता पसरते. चांगल्या समाजासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणाची शपथ घेतली पाहिजे.”

हेही वाचा :

आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावर?; वाचा बाळसाहेब थोरात काय म्हणाले?

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची खोचक टीका

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment on population control and UP policy