शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या पिस्तुलातून विमानतळावर गोळीबार; सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात, मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या पिस्तुलातून फायरिंग झाल्याची घटना विमानतळावर घडली आहे, या घटनेत दोन विमानतळावरील कर्मचारी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या पिस्तुलातून विमानतळावर गोळीबार; सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात, मोठी खळबळ
Varanasi airport
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 4:18 PM

मोठी बातमी समोर येत आहे,  वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान पिस्तुलातून अपघाती गोळी सुटल्याची घटना घडली आहे, यामध्ये विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.  शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून हा गोळीबार झाला आहे. रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बाबतपूर (वाराणसी) विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे काही काळ चांगलंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. कमलेश राय हे पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने (IX-1810) मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते, याच दरम्यान ही घटना घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी नगरसेवक कमलेश राय हे पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने (IX-1810) मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. नियमानुसार पिस्तूल सील करून पायलटच्या केबिनमध्ये ठेवण्यापूर्वी त्याची मॅगजीन वेगळी करताना ट्रिगर दबल्या गेल्याने अपघाताने एक राउंड फायर झाला  आहे. ही घटना बाबतपूर (वाराणसी) विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत घडली आहे.  या अपघाती गोळीबारामुळे विमानतळावर सुरक्षेची तपासणी करणारी महिला कर्मचारी सुमन यांच्या पायाला थेट गोळी लागली, तर पुरुष कर्मचारी रोहित यांच्या हाताला आणि पायाला गोळीचे छर्रे लागून ते जखमी झाले आहेत. दरम्यान या दोघांना  उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमलेश राय ताब्यात 

दरम्यान या अपघाती गोळीबारामुळे विमानतळावरचे दोन कर्मचारी जखमी झाल्याने आता कमलेश राय यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी कमलेश राय यांना ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिसांमार्फत पुढील कायदेशीर कारवाई व चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावर मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. पोलीस आता या घटनेचा अधिक तपास करत आहेत, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us