मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव, विमानतळाच्या मुख्यालयासाठी आक्रमक भूमिका घेऊ; विनायक राऊतांचा इशारा

| Updated on: Jul 20, 2021 | 12:24 PM

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (vinayak raut)

मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव, विमानतळाच्या मुख्यालयासाठी आक्रमक भूमिका घेऊ; विनायक राऊतांचा इशारा
विनायक राऊत, शिवेसना खासदार
Follow us on

नवी दिल्ली: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ही अत्यंत निषेधार्ह बाब असून मुंबईचे अहमदाबाद करण्याचा हा डाव आहे, असं सांगतानाच विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील. त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. (shiv sena opposed mumbai airport Head Office Relocation at ahmedabad)

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा इशारा दिला आहे. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचं महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जातेय. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशाराच राऊत यांनी दिला.

तर गणेश चतुर्थीपूर्वीच सिंधुदुर्गातून विमानांचे उड्डाण

विनायक राऊत यांनी नवे नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची काल भेट घेतली. यावेळी त्यांची सिंधियांबरोबर सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सिंधुदुर्ग विमानतळ विमान उड्डाणाला सज्ज झाले आहे. DGCA रिपोर्टची वाट पाहत आहोत. हा परवाना मिळवण्यासाठी 28 जूनला आयआरबीने अर्ज केला आहे. कोरोनामुळे डीजीसीए टीम सिंधुदुर्गात जाऊ शकलेली नाही. पण ती लवकरात लवकर जावी आणि लवकर परवाना मिळावा अशी आमची मागणी आहे. मंत्र्यांनी मला 8 ते 10 दिवसांत रिझल्ट देतो असा शब्द मला दिला आहे. येत्या 8 – 10 दिवसात टीम सिंधुदुर्गात गेली आणि लगेच परवाना मिळाला तर गणेश चतुर्थीपूर्वी विमान उडायला काही हरकत नाही, असं ते म्हणाले.

संजय राऊतांचा इशारा

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही विमानतळाच्या मुख्यालयावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानततळ आहे हे मी सांगू शकतो आणि ते तसेच राहणार. महाराष्ट्राच्या राजधानीत ते विमानतळ आहे. जर कोणी अशा प्रकारे काही करत असेल तर त्यांनी फक्त ते छत्रपती शिवाजी महाराज नाव पाहावे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (shiv sena opposed mumbai airport Head Office Relocation at ahmedabad)

 

संबंधित बातम्या:

“बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत”

Parliament Monsoon Session: फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, शिवसेना करणार लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी

Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

(shiv sena opposed mumbai airport Head Office Relocation at ahmedabad)