“बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत”

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत
उद्धव ठाकरे, संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:41 AM

मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोमणा संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे यांनी ट्विट करुन हल्लाबोल केला.

संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”

संदीप देशपांडे यांचं ट्विट 

मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले. काल रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.

शासकीय महापूजा 

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

संबंधित बातम्या   

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

‘विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.