परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो: संजय राऊत

| Updated on: Feb 03, 2022 | 10:15 AM

संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं.

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो: संजय राऊत
संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. या संवादामध्ये संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. यावेळी प्रवीण राऊत यांच्यावर ईडीकडून (ED) करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या सहन करु , असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या? हा खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. परमबीर सिंग यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबासंदर्भातही संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. परमबीरसिंग हे आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत, त्यांना जे बोलायचं ते बोलूद्यात, असं संजय राऊत मम्हणाले.

कुछ मिला क्या?

ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या 2024 सहन करु , असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या?, हा सर्व खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

परमबीर सिंग आरोपी

परमबीर सिंग हे आरोपी आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप आहेत माहिती नाही. पण ते आरोपी आहेत. ते मुख्यमंत्री यांचं नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्ही देखील काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतो. देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जायचं.

नितेश राणे प्रकरणी बोलताना आम्ही सर्वजण लॉमेकर्स आहोत. कुणी खासदार कुणी आमदार आहेत. न्यायालयीन लढाई सुरु आहे. ते न्यायालयीन लढत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र हे कायद्यानं चालणार राज्य आहे, असं राऊत यांनी म्हटलं

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे पक्षांतर आमदारांना रस्त्यात तुडवा

गोव्यात आपनं उमेदवारांना शपथ दिली याविषयी बोलताना संजय राऊत यांनी जनतेचं प्रबोधन करावं लागेल. याला जबाबदार जनता असते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते पक्षांतर करणाऱ्या आमदारांना रस्त्यात तुडवा. ते जरी कायद्याच्या कसोटीवर बरोबर वाटत नसेल तरी एका पक्षातून निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जातात असं होत असेल तर जनतेचा विश्वासघात होतो. त्यामुळं गोव्यात जाऊन जनेतेचे प्रबोधन करत आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांचे कालचे भाषण मुद्देसूद रोखठोक होतं.पंतप्रधानांनी ते भाषण ऐकायला पाहिजे होतं पंतप्रधानांनी भाषण ऐकल असत तर त्यांना नवीन विषय मिळाले असते, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

TET Exam Result Update : टीईटीचा निकाल कधी लागणार? MSCE च्या अध्यक्षांकडून महत्त्वाची माहिती

भाजपा कार्यकर्त्यांना डिवचल्यास “जशास तसे उत्तर देऊ”, काँग्रेसच्या मोर्चावरून पॉलिटिकल रणांगण

Shivsena MP Sanjay Raut said Parambir Singh is accused in extortion case because of this take name of others