Social media: धक्कादायक, भारतात 73 टक्के मुलांकडून मोबाईलचा वापर, त्यातील इतके टक्के मानसिक आजाराने त्रस्त

| Updated on: Sep 09, 2022 | 8:13 PM

जनरेशन झेड म्हणजे 1997ते 2012 या काळात जन्माला आलेली परदेशातील पीढी मात्र सोशल मीडियापासून डिचॅट झाल्यासारखी दिसते आहे. विशेष करुन फेसबुकपासून ती लांब जाताना दिसते आहे. आभासी जगातील मैत्रीवर त्यांचा विश्वास कमी होताना दिसतो आहे.

Social media: धक्कादायक, भारतात 73 टक्के मुलांकडून मोबाईलचा वापर, त्यातील इतके टक्के मानसिक आजाराने त्रस्त
मोबाईल, सोशल मीडियामुळे मानसिक आजार
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – सोशल मीडिया (Social Media)आणि मोबाईलची (Mobile)क्रेझ सध्या देशात सगळ्यांना दिसते आहे. यात लहान मुलेही मागे नाहीत. राष्ट्रीय पातळीवर काही संस्थांकडून याबाबत संशोधन केले असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या देशात 73 टक्के मुलं ही मोबाईलचा वापर करीत आहेत. या मुलांपैकी 30  टक्के मुले ही मानसिक आजाराने (mental illness)पीडित असल्याचे समोर आले आहे. मोबाीलचा वापर करणाऱ्या 10 पैकी 3 मुलांना डिप्रेशन, भीती, चिंता आणि चिडचिडेपणा यातील कशानकशाचा त्रास सहन करावा लागतो आहे. इंग्लंडमधील नेच कम्युनिकेशनच्या एका अभ्यासात सोशल मीडियाच्या वापराचे दुष्परिणामही समोर आले आहेत. यामुळे लहान मुले आणि अल्पवयीन तरुणांच्या मेंदे, हार्मोन्स आणि वागणुकीवर परिणाम होत असल्याचे निष्पन्न समोर आले आहे.

पालकांच्या काळातील गाण्यांची आवड

मुलांमध्ये 1990 च्या दशकातील फॅशन आवडत असल्याचेही समोर आले आहे. आता ही फॅशन पुन्हा एकदा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. या नव्या मुलांमध्ये त्यांच्या आधीच्या पिढीकडे असलेल्या वस्तूंबाबत क्रेझ दिसते आहे. यात कपडे, गाणी, सोशल मीडिया, सवयी यांचा समावेश आहे. त्या काळासारखे कपडे घालावेत असे या नव्या पिढीला वाटते आहे.

परदेशात मात्र सोशल मीडियाची क्रेझ मावळली

जनरेशन झेड म्हणजे 1997ते 2012 या काळात जन्माला आलेली परदेशातील पीढी मात्र सोशल मीडियापासून डिचॅट झाल्यासारखी दिसते आहे. विशेष करुन फेसबुकपासून ती लांब जाताना दिसते आहे. आभासी जगातील मैत्रीवर त्यांचा विश्वास कमी होताना दिसतो आहे. जर 1981 ते 1996 या काळात जन्माला आलेले आणि आता 26ते 41या वयोगटातील लोकं अजूनही फेसबुकचा नियमित वापर करत असल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेत नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेनुसार, अमेरिकेत 13 ते 17 वयोगटातील केवळ 32 टक्के टीनएजर्स नियमित रुपाने फेसबुकचा वापर करीत आहेत. 2014-15 याच काळात हाच आकडा 71 टक्क्यांचा आसपास होता. नवी पीढी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचा वापरही करताना दिसते आहे. अमेरिकेत सोशल मीडियाच्या युझर्समध्ये आलेली घट एकदम आलेली नाही. टीन एजर्समध्ये फेसबुकचा वापर गेल्या पाच वर्षांत घटताना दिसतो आहे.