
नवी दिल्ली, श्रद्धा वालकर हिची क्रूर हत्त्या (Shraddha Walkar Murder) करून शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला (Aftab Punawala) सध्या तिहार तुरुंगात आहे, त्याला शुक्रवारी साकेत न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिहार तुरुंग प्राधिकरणाने आपल्या तिसर्या बटालियनला आरोपी आफताबला विशेष सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. आज त्याला संबंधित न्यायाधीशासमोर हजर केले जाणार आहे. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने मेहरौली पोलिसांना खुले आव्हान दिले आहे की, “मी श्रद्धाला मारले आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शरीराचे अवयव आणि हत्यारे जप्त करून दाखवा”.
हे आव्हान तो पुन्हा पुन्हा देत आहे. आरोपीच्या या आव्हानाबाबत दक्षिण जिल्ह्याचे पोलिस अधिकारीही हतबल झाले आहेत. त्याचा आत्मविश्वास पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेहरौली पोलिसांनी आरोपीला पकडले तेव्हा आफताबने श्रद्धाला मी मारल्याचे सांगितले होते. हिम्मत असेल तर शरीराचे तुकडे शोधून दाखवा. हे आव्हान तो आता सातत्याने देत आहे. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत.
छतरपूरच्या जंगलातून सापडलेला जबडा आणि 100 फूट रस्त्यावरून सापडलेले मृतदेहाचे तुकडे श्राद्धाचे असल्याचे समजते. शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. मात्र, पोलिसांनी आफताबच्या स्वयंपाक घरातून पाच चाकू जप्त केले. याचा वापर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला होता.
आफताब जवळपास महिनाभर श्रद्धाचा मोबाईल वापरत होता. मात्र, त्याने कुणालाच फोन केला नाही, तर व्हॉट्स ॲप चॅटिंग केले. एकदा श्रध्दाचा मित्र लक्ष्मण याने आफताबला व्हॉट्सॲप मेसेज केला होता, त्यावर ती आता व्यस्त असल्याचे आफताबने सांगितले.
नंतर त्याने लक्ष्मणला निरोप दिला की श्रद्धा त्याला सोडून गेली आहे. यानंतर त्याने श्रद्धाचा मोबाईल आणि सिम मुंबईला नेले आणि समुद्रात फेकले. पोलिसांना अद्याप श्रद्धाचा मोबाईल आणि सिम मिळालेले नाही.