AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या वेलीसाठी वेडा होतो साप, ही वनस्पती म्हणजे सापांचं सेकंड होमच, तरीही अनेकजण घरात लावण्याची चूक करतात

उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इतर ऋतुंच्या तुलनेत सर्पदंशाच्या घटानांमध्ये अधिक वाढ होते, कारण या काळात साप थंड जागेच्या शोधात घरात देखील शिरतात. परंतु अशा देखील काही वनस्पती असतात ज्या आपल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात.

या वेलीसाठी वेडा होतो साप, ही वनस्पती म्हणजे सापांचं सेकंड होमच, तरीही अनेकजण घरात लावण्याची चूक करतात
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 06, 2026 | 11:50 PM
Share

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात जमीन तापते. साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णता सहन होत नाही आणि ते बिळातून बाहेर पडतात. बिळातून बाहेर पडलेला साप हा आपल्याला लपण्यासाठी सुरक्षीत जागा शोधत असतो. थंड आणि थोडासा अंधार असलेली जागा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सापांना सर्वात जास्त आवडते. त्यामुळे साप नेहमी अशा जागेच्या शोधात असतात. अनेकदा अशी जागा सापांना आपल्या घरात सापडते. त्यामुळे साप आपल्या घरात घुसतात. आपण बेसावध असल्यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता आवढते,

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकांना बाग कामाची आवड असते, उन्हाळ्यामध्ये आपण झाडांना अधिक पाणी देतो त्यामुळे जमीन ओली असते. अशावेळी जमीन जिथे ओली असेल तिथे साप झाडाच्या आडोशाला आश्रय घेतात, साप स्वत:हुन कधीही एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाहीत, मात्र त्यांना धोका जाणवल्यास ते आपल्यावर हल्ला करू शकतात. तसेच त्यांना जर वाटलं तुम्ही त्यांची शिकार आहात तरी देखील ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे या काळात आपल्या बागेमध्ये देखील साप निघण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील.

तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा बागेमध्ये लावलेल्या काही वनस्पती अशा देखील असतात, ज्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप त्यांच्याकडे आकर्षित होतो, आणि अशा झाडांखाली आश्रय घेतो. त्यामुळे अशा वनस्पती बागेत लावताना काळजी घेणं गरजेचं असतं. शक्यतो या वनस्पती  घरात लावूच नये आणि लावली तर योग्य खबरदारी घ्यावी. आज आपण ज्या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. ती वनस्पती म्हणजे  जुईचा वेल आहे. जुईला सुवासिक फुल येतात. हा वेळ मोठ्या प्रमाणात पसरतो त्यामुळे तिथे अडचण तयार होते. जुई 12 महिने देखील हिरवीगार राहत असल्याने सापांना या वेलीमध्ये थंडावा मिळतो. तसेच लपण्यासाठी पुरेशी जागा देखील उपलब्ध होते. त्यामुळे या वेलीच्या आसपास किंवा वेलीमध्ये अनेकदा साप आढळून येतात. त्यामुळे या वेलीची वेळोवेळी कटिंग होणं महत्त्वाचं असतं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल