
Shubhanshu Shukla Axiom 4 Mission: भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करत आहेत. नासाच्या फॉल्कन-9 या यानातून गेलेल्या शुभांशू शुक्ला यांनी इतर अंतराळवीराबरोबर अंतराळातील रोमांच शेअर केला. एक्सिओम स्पेसने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शुभांशू आपला अनुभव सांगत आहेत.
ॲक्सिऑम-4 मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी अवकाशात उड्डाण केले. शुभांशू यांनी अंतराळातून पाहिला संदेश पाठवला. नमस्कार, फ्रॉम स्पेस… माझ्या प्रिय देशवासीयांनों, काय विलक्षण प्रवास आहे. 41 वर्षानंतर पुन्हा अंतराळात. हा रोमांचक अनुभव आहे. अंतराळवीराच्या माझ्या पोशाखावर भारताचा तिरंगा ध्वज आहे. तो मला सतत आठवण करु देत आहे की, मी तमाम भारतीयांपैकी एक आहे. माझ्या देशातील 1.4 अब्ज लोकांचा पाठिंबा मला मिळतो. माझ्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या प्रवासाचा आनंद घ्या.
Ax-4 Mission | In-Flight Update https://t.co/Lqu0QiGGrA
— Axiom Space (@Axiom_Space) June 26, 2025
शुभांशू पायलट म्हणून ॲक्सिऑम-4 मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत क्रू मेंबर कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोश उज्नांस्की-विश्निव्स्की (पोलंड) आणि टिबोर कपू (हंगरी) आहे. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जात आहे. त्यांचा प्रवासाचा अनुभव संपूर्ण भारताला अभिमानास्पद वाटत आहे. एक्सवरील @Axiom_Space वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगण्याचा अनुभव सांगितला. तसेच अंतराळातून पृथ्वीचे सौंदर्य पाहण्याची मजा शेअर केली. शुभांशू म्हणाला की, हा माझा प्रवास नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे.
#WATCH | #AxiomMission4 का संचालन कर रहे भारतीय अंतरिक्ष यात्री ग्रुप कैप्टन सुभांशु ने अंतरिक्ष में अपनी यात्रा के बारे में जानकारी देते हुए कहा, "अंतरिक्ष से नमस्कार! मैं अपने साथी अंतरिक्ष यात्रियों के साथ यहां आकर रोमांचित हूं।"
एक खिलौना हंस को लेकर उन्होंने कहा कि भारतीय… pic.twitter.com/JiChRCgrcQ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2025
शुभांशू यांनी म्हटले की, अंतराळ प्रवास माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. अंतराळात उड्डानानंतर जेव्हा मी पृथ्वीकडे पाहिले तेव्हा वाटले, एखाद्या चित्रकाराने निळा आणि हिरवा रंग मिळून कॅनवास तयार केला आहे. मायक्रोग्रॅव्हीटीमध्ये जाणे मजेशीर अनुभव आहे. लॉन्चच्या दहा मिनिटांत ड्रॅगन यान रॉकेटपासून वेगळा झाला. त्यावेळी खिडकीतून मी सूर्याचे तेज आणि तारे पाहिले. हे सर्व माझ्यासाठी अविश्वसनीय होते. मी माझ्या क्रू मेंबरसोबत हसलो, विनोद केले. काही योगासनेही केली. स्ट्रॉने पाण्याचे पाउच पिणे थोडे कठीण आहे. पण ते देखील मजेदार आहे.