UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

| Updated on: Sep 30, 2020 | 12:56 PM

हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर महीला आणि बालकल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका होत आहे (Smriti Irani is being criticized after the death of a rape victim of Hathras)

UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी
Follow us on

दिल्ली : हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यावर टीका होत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री असताना स्मृती इराणी या बलात्कार प्रकरणावर गप्प का?, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जातोय. (Smriti Irani is being criticized after the death of a rape victim of Hathras)

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकार तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका होत आहे.  “हाथरस बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत? काँग्रेसच्या सत्ताकाळात स्मृती इराणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायच्या. पण आता त्या शांत आहेत का आहेत?. सत्तेत नसताना बलात्कारासारखे मुद्दे त्यांना गंभीर वाटायचे? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांच्याकडे त्या राजीनामा का मागत नाहीत?”, असे अनेक प्रश्न त्यांना सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

 

स्मृती इराणी यांचे आंदोलन करतानाचे जुने व्हिडिओ आणि ट्वीट्सही व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका करत बलात्काऱ्यांना फाशीची देण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओंचा आधार घेत, “विरोधी पक्षात असताना त्यांची मुलींविषयीची कळकळ दिसायची, पण तीच माया आता का दिसत नाही?, असंही नेटकऱ्यांकडून त्यांना विचारलं जातंय.

 

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण काय आहे?

दिल्लीपासून सुमारे 200 किमीवर असलेल्या हाथरस गावात 14 सप्टेंबरला तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. चार ते पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप तरुणीच्या भावाने केला आहे. भावाच्या म्हणण्यानुसार, त्याचा मोठा भाऊ, आई आणि बहीण शेतात गेले होते. मोठा भाऊ लवकर घरी आल्यानंतर आई आणि बहीण शेतात काम करत थांबले. त्याचवेळी चार ते पाच जण गुपचूप आले. त्यांनी बहिणीच्या गळ्यात ओढणी टाकून तिला शेजारच्या शेतात जबरदस्तीने घेऊन गेले. बहीण गायब असल्याचे कळताच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला. पण ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले.” असे पीडितेच्या भावाने सांगितले.

दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

संंबंधित बातम्या :

. उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

विधवेवर सामूहिक बलात्कार, आमदारासह मुलगा आणि भाच्यावर गुन्हा दाखल

(Smriti Irani is being criticized after the death of a rape victim of Hathras)