स्मृती इराणींना गॅस, पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, ‘हु आर यू…’ विमानात पाहा काय घडलं?

Smruti Irani Viral Video in Plane : वाढत्या महागाईवर प्रश्न विचारल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपल्याही मोबाईलमधून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं सेल्फी कॅमेऱ्यातून प्रश्न सुरु ठेवले होते

स्मृती इराणींना गॅस, पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, हु आर यू... विमानात पाहा काय घडलं?
जाणून घ्या, विमानात नेमकं काय घडलं?
Image Credit source: Twitter Video Grab
| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 6:58 PM

मुंबई : स्मृती इराणींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला (Smruti Irani viral Video) आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेनं स्मृती इराणी यांना गॅसदरवाढीवरुन आणि इंधनांच्या महाग (Inflation) झालेल्या किंमतींवरुन प्रश्न केला. विमानातून उतरतेवेळी हा प्रश्न महिलेनं स्मृती इराणी यांना उपस्थित केला होता. त्यावेळी स्मृती इराणी यांचं पहिलं उत्तर होतं, ‘हू आर यू’ (कोण आहात तुम्ही)! स्मृती इराणींना विमानात प्रश्न विचारणाऱ्या या महिलेनं प्रश्न विचारण्याआधीच आपल्या मोबाईलमधून रेकॉर्डिंग सुरु केलं होतं. या संपूर्ण घटनेचा संवाद आता व्हायरल झाला आहे. चकीत करणारी बाब म्हणजे स्मृती इराणी यांनी विमानातून उतरल्यानंतर स्वतःही आपल्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. विमानातून बाहेर पडताना लॉबीतून चालतेवेळी झालेला हा प्रश्नोत्तराचा संवाद आता सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. वाढत्या महागाईनं त्रस्त झालेल्या एका महिलेनं हा मुद्दा स्मृती इराणी दिसताच त्यांना विचारण्याचं धाडस केलं. तेव्हा ही सगळी घटना घडली.

नेमका व्हिडीओ कधीचा?

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र गुवाहाटी येथे विमानातून प्रवास करतेवेळी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. यावेळी सुरुवातील स्मृती इराणी यांना महिलेनं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. गॅस दरवाढ, पेट्रोलची भाववाढ यावर एका महिलेनं स्मृती इराणींना सवाल केले.

सुरुवातील स्मृती इराणी यांनी हातानेच खुणावून मोबाईल रेकॉर्डिंग बंद करण्यासाठी, मोबाईल खाली घेण्यासाठी आवाहन केलं. हातानेच त्या याबाबत महिलेला खुणावताना दिसल्या. मात्र आक्रमक महिलेनं आपलं प्रश्न विचारणं सुरुच ठेवलं.

विमानातून उतरल्यानंतर प्रश्नोत्तर

दरम्यान, विमानातून बाहेर आल्यानंतरही या महिलेनं आपले प्रश्न सुरु ठेवले होते. स्मृती इराणी मागे आणि ही महिला पुढे चालत होत्या. विमानातून उतरल्यानंतर लॉबीतून चालताना त्यांचे सवाल जवाब सुरु होते.

स्मृती इराणींनी काय उत्तर दिलं?

वाढत्या महागाईवर प्रश्न विचारल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपल्याही मोबाईलमधून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं सेल्फी कॅमेऱ्यातून प्रश्न सुरु ठेवले होते. या महिलेच्या प्रश्नांना उत्तर देताना स्मृती इराणींनी कोरोना काळात सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली होती. सरकारी योजनांबाबत स्मृती इराणी सांगत असल्याचं ऐकू येतंय. मात्र स्मृती इराणी यांचं स्पष्टीकरण या महिलेनं खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी गॅस दरवाढीच्या आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांच्या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर देणं टाळलं असल्याची चर्चा आता सोशल मीडियात रंगू लागली आहे.

प्रश्न विचारणारी महिला कोण?

दरम्यान, स्मृती इराणींना प्रश्न विचारणारी ही महिला आहे नेत्ता डिसोझा. नेत्ता या काँग्रेस नेत्या आहेत. महिला काँग्रेस अध्यक्ष असलेल्या नेत्ता डिसोझा या गुवाहाटीला जायला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात स्मृती इराणीही गुवाहाटीला त्याच विमानानं निघाल्या होत्या. हे पाहून विमानातून उतरतेवेळी नेत्ता डिसोझा यांनी स्मृती इराणींना सवाल करत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केलाय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पडताळणी: ‘इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलची कमी दरवाढ’ पेट्रोलियम मंत्र्यांच्या दावा खरा की खोटा?

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ… हे फॅक्टर ठरताय कारणीभूत

जगातील सर्वाधिक महाग ‘एलपीजी’ भारतामध्ये; तो कसा? समजून घ्या त्यामागचे गणित

पाहा उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात टीका करताना नेमकं काय म्हटलं?