खुळ्यांचा बाजार… Reel Viral करण्यासााठी डेंजर नाग गळ्यात घालून काढत होता व्हिडीओ, डसल्यानंतर थेट… अवघ्या तेविशीतील तरुणाचं काय झालं?

नागपंचमीच्या दिवशी एक 23 वर्षीय तरुण गळ्यात नाग घालून व्हिडिओ बनवत होता. मात्र याच दरम्यान त्याला नाग चावला, त्यामुळे त्याची तब्ब्येत बिघडली.

खुळ्यांचा बाजार... Reel Viral करण्यासााठी डेंजर नाग गळ्यात घालून काढत होता व्हिडीओ, डसल्यानंतर थेट... अवघ्या तेविशीतील तरुणाचं काय झालं?
Snake Bite
| Updated on: Jul 30, 2025 | 7:38 PM

संपूर्ण देशात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच सणाच्या दिवशी उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर रिल्स बनवण्याच्या नादात एका तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी एक 23 वर्षीय तरुण गळ्यात नाग घालून व्हिडिओ बनवत होता. मात्र याच दरम्यान त्याला नाग चावला, त्यामुळे त्याची तब्ब्येत बिघडली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिल्ससाठी व्हिडिओ बनवत होता

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना औरैया जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसरातील दयालपूर-भिखमपूर भागातील आहे. नागपंचमीच्या दिवशी, एक सर्पमित्र साप घेऊन गावात फिरत होता. त्यावेळी गावातील अमित नावाचा मुलगा तिथे आला. त्याने सर्पमित्राकडून साप घेतला आणि गळ्यात घालला. त्यावेळी त्याचा मित्र सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत होता. मात्र यानंतर जे घडले त्यामुळे अमितच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सापाने घेतला चावा

अमितने नाग गळ्यात घातला होता आणि त्यावेळी त्याचा मित्र रील बनवत होता. व्हिडिओ सुरु होताच सापाने त्याच्या हाताचा चावा घेतला. साप चावताच अमितची प्रकृती बिघडू लागली, त्याला वेदना होऊ लागल्या. साप चावल्याची माहिती समजताच कुटुंबातील सदस्यांनी त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सलाईन लावण्यात आले आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.

प्रकृती चिंताजनक

अमितवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याची प्रकृती आता स्थिर असली तरी परिस्थिती चिंताजनक आहे. सोशल मीडियावरील रील बनवण्याच्या नादात या तरुणाने आपला जीव धोक्यात टाकला आहे. या सारख्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. अशाच रीलच्या नादात अनेकांचा जीव धोक्यात आला होता. साप चावलेल्या तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नसते तर ही रील त्याच्या आयुष्यातील शेवटची रील ठरली असती. त्यामुळे तुम्हीही रील किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादात जीव धोक्यात टाकू नका.