Sonam Raghuvanshi : महिन्याला सोनमची कमाई किती? राजाच्या हत्येची सुपारी देण्यासाठी 20 लाख आले कुठून?
Sonam Raghuvanshi Income : सोनम कुटुंबाच्या उद्योगात Human Resource (HR) ची प्रमुख म्हणून काम पाहत होती. ती कर्मचार्यांची भरती आणि प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. याशिवाय इतर पण अनेक कामं ती करत होती.

इंदूर येथे राहणारी सोनम रघुवंशी अजूनही सातत्याने चर्चेत आहे. उद्योगात तिने मोठे यश मिळवले म्हणून नाही तर पती राजा रघुवंशी याची हत्या केल्याप्रकरणात ती चर्चेत आहे. आता पोलिसांचा तपास जस जसा पुढे सरकत आहे, तस तसा या खूनाच्या प्रकरणातील इतर पदर समोर येत आहे. सोनम खून करणाऱ्यांना 20 लाख रुपये कुठून देणार होती. तिची कमाई किती याकडे पोलिसांनी तपासाचा मोर्चा वळवला. त्यावर अनेक गोष्टी समोर आल्या.
प्लायवूड आणि डेकोरेटिव्ह व्यापाराची मुलगी
सोनम मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील देवी सिंह रघुवंशी यांची शहरात एक प्लायवूड कंपनी आहे. तिचा विस्तार गुजरातपर्यंत पसरला आहे. गुजरातमधील युनिटची जबाबदारी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशीकडे आहे याशिवाय हे कुटुंब 16000 कोटी रुपयांच्या डेकोरिटिव्ह इंडस्ट्रीत पण सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
सोनम होती HR हेड
सोनम आपल्या या कुटुंबाच्या व्यवसायात Human Resource (HR) प्रमुख म्हणून काम करत होती. कंपनीत तिची जबाबदारी केवळ कर्मचार्यांची भरती आणि प्रशिक्षण देण्यापर्यंत मर्यादीत नव्हती. तर इतर कामामध्ये पण लक्ष घालत होती. सोनमला कंपनी नियमीतपणे पगार देत होती. इतकेच नाही तर व्यावसायिक नफ्यातील काही भाग तिला देण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
हवाला व्यवहारातही नाव
पोलिसांच्या तपासात हवाला व्यवहाराशी सुद्धा सोनम जोडल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. तिचा मावसभाऊ जितेंद्र रघुवंशी याच्या चार बँक खात्याचा वापर हा लाखो रुपयांच्या संशयित व्यवहारासाठी केल्याची माहिती समोर आली आहे. तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने ती हवाला व्यवहार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
इतकेच नाही तर सोनमच्या खात्यात सुद्धा जवळपास 20 लाख रुपायंची रक्कम असल्याचे तपासात समोर आले आहे. तिची आई उमा रघुवंशी यांनी सुद्धा सोनमकडे पैशांची कमी नसल्याचे म्हटले आहे. तिचे वडील तिच्या खात्यात पैसा जमा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येची योजना आणि पैशांचा वापर
राजा याच्या हत्येची योजना सोनमने अगोदरच केली होती. ही हत्या लुटीचा भाग असल्याचे सोनम भासवणार होती. घटनेपूर्वी सोनमने राज याला सोन्याची साखळी, अंगठी घालण्याचा आग्रह केला होता. तिने स्वतः पण दागिने घातले होते. त्यामुळे ही घटना एक लूट असल्याचे तिला भासवता आले असते. 23 मे रोजी शिलाँग येथे हत्ये अगोदर तिने आरोपींना 15 हजार रुपये आणि नंतर 20 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.