बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलेनं बनवलं असं यंत्र; थेट नराधमाचा प्रायव्हेट पार्टच..

देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही. हे घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. वाईट कृत्य केल्यानंतर नराधम मोकाट फिरतो, नाही त्याला शिक्षा सुनावण्यासाठी अनेक वर्ष लागतात, अशात महिलेनेच असं एक यंत्र बनवलं आहे. ज्यामुळे महिलांवर बलात्कार होणार नाही.

बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलेनं बनवलं असं यंत्र; थेट नराधमाचा प्रायव्हेट पार्टच..
| Updated on: May 18, 2026 | 11:59 AM

भारतात दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत मोठ्याने वाढ होत आहे. आज 3 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांची वृद्ध महिला देखील सुरक्षित नाही… हे सध्याच्या जगातील वास्तव आहे. कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही. अशात महिलांच्या सुरक्षेसाठी एका महिलेनेच असं यंत्र विकसित केलं आहे, ज्यामुळे महिलांवर बलात्कार होणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील एका महिला डॉक्टरने एक असं यंत्र तयार केलं आहे, जे बलात्कार करणाऱ्याला गुन्हा घडत असतानाच धडा शिकवेल.

महिलेने तयार केलेल्या यंत्राचं नाव रेप-एक्स (Rape-aXe) असं ठेवण्यात आलं आहे. ज्याला ‘एंटी-रेप कंडोम’ असं देखील म्हटलं जातं. डॉ. सोनेट एहलर्स यांनी हे यंत्र विकसित केलं आहे. सोनेट यांनी मेडिकल टोक्नीशियन म्हणून काम सांभाळलं आहे.

एवढंच नाही तर, बलात्कार पीडित महिलांसोबत काम करत असताना, त्यांनी मन विचलित करणाऱ्या घटना ऐकल्या आहेत. एक पीडित महिला डॉ. सोनेट यांनाा म्हणालेली, ‘माझ्या प्रायव्हेट पार्टच्या जागी दात असते तर…’, हिच घटना लक्षात घेत, त्यांनी 40 वर्षांच्या मेहनतीनंतर रेप-एक्स यंत्र तयार केलं आहे.

यंत्र कसं करतं काम?

2005 मध्ये हे यंत्र सार्वजनिकरित्या सादर करण्यात आलं. महिला या यंत्राचा वापर टॅम्पॉनप्रमाणे करु शकतात. यंत्राच्या आतल्या बाजूला तीक्ष्ण, वाकलेले आकड्यांसारखे किंवा दातांसारखे काटे असतात. जेव्हा बलात्कार करणारा हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, तसे हे आकडे त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतात. यामुळे नराधमाला इतकी तीव्र वेदना होते की तो किंचाळतो आणि तात्काळ जखमी होतो.

रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेत बलात्काराचं प्रमाण फार मोठं आहे. अशात यंत्र महिलांच्या सुरक्षेसाठी मोठं हत्यार असणार आहे… सध्या हे यंत्र सर्वत्र चर्चेत आहे… सोशल मीडियावर यंत्राबद्दल माहिती शेअर होत आहे. अनेक महिलांनी याचं समर्थन केलं तर, अनेकांने ते विवादास्पद वाटलं आहे… काहींच्या मते हे यंत्र पुरुषविरोधी आहे आणि गुन्हेगारांना अधिक हिंसक बनण्यास प्रोत्साहन देऊ शकतं.

यावर डॉक्टर म्हणाल्या की, या यंत्राचा उपयोग कोणत्याही प्रकारचा बदला घेण्यासाठी नाही तर, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि नराधमाला पकडण्यासाठी होईल. पण हे यंत्र अद्याप बाजारात उपलब्ध नाही… नमुना सादर झाल्यानंतरही, त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं नाही. काही रिपोर्टनुसार, 2010 च्या विश्वचषकासाठी मर्यादित स्वरूपात विक्रीची योजना होती, परंतु यंत्राचं मोठ्या प्रमाणावर वितरण कधीच झालं नाही.

Follow Us