मोठी दुर्घटना टळली! दिल्ली एअरपोर्टवर SpiceJet विजेच्या खांबाला धडकले

| Updated on: Mar 28, 2022 | 7:11 PM

दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज एक मोठा अपघात झाला आहे. स्पाईसजेटचे विमान (SpiceJet Flight Accident) दिल्ली विमानतळावर विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमान आणि खांबांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोठी दुर्घटना टळली! दिल्ली एअरपोर्टवर SpiceJet विजेच्या खांबाला धडकले
विमान विजेच्या खांबाला धडकले
Follow us on

नवी दिल्ली: दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज एक मोठा अपघात झाला आहे. स्पाईसजेटचे विमान (SpiceJet Flight Accident) दिल्ली विमानतळावर विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमान आणि खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघाताबाबत बोलताना विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली (Delhi) विमानतळावर विमानाच्या पुशबॅक दरम्यान स्पाईसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांसाठी विमान बदलण्यात आले. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला आहे.

जम्मूला निघाले होते विमान

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला. ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विमानाचे नुकसान

या अपघातामध्ये विमानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विमान खांबाला धडकले. विमान खांबाला धडकल्यानंतर विजेचा खांब देखील वाकला. अपघातानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले वक्तव्य भाजपला भोवले; दिल्ली विधानसभेतून 3 आमदार निलंबित

Bengal: पश्चिम बंगालच्या विधानसभेत राडा, एकमेकांना मारहाण, कपडेही फाडले, आमदार रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

Pramod Sawant : प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, मंत्रिमंडळात गोमंतक पक्षाला स्थान नाही, कोण आहेत नवे मंत्री?