Sri Lanka President House Attack : समुद्र मार्गे पळाले की विमानातून फरार?, श्रीलंकेत एकच चर्चा राष्ट्रपती पळाले तरी कसे?; पाहा VIDEO

| Updated on: Jul 10, 2022 | 10:53 AM

राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी कोलंबोमध्ये प्रचंड निदर्शनं झाली आणि लोक राष्ट्रपती भवनात घुसले आहेत. संतप्त आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत अनेक गोळीबार केला. लोकांचा संताप पाहून अध्यक्ष तात्काळ तेथून निघून गेले.

Sri Lanka President House Attack : समुद्र मार्गे पळाले की विमानातून फरार?, श्रीलंकेत एकच चर्चा राष्ट्रपती पळाले तरी कसे?; पाहा VIDEO
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : आर्थिक संकटात अडकलेल्या भारताचा शेजारी देश श्रीलंकेची (Sri Lanka) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राजधानी कोलंबोमध्ये शनिवारी (9 जुलै, 2022) आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) तेथून पळून गेले. पण, राष्ट्रपती समुद्रामार्गे पळाले की विमानानं याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्याचवेळी सुरक्षा दलाच्या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाल्याचं वृत्त आहे. राजपक्षे यांनी तात्काळ राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी कोलंबोमध्ये प्रचंड निदर्शनं झाली आणि लोक राष्ट्रपती भवनात घुसले आहेत. संतप्त आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत अनेक गोळीबार केला. लोकांचा संताप पाहून अध्यक्ष तात्काळ तेथून निघून गेले. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीनं श्रीलंकेच्या संरक्षण विभागातील सूत्रांना (Defence Source) सांगितले की, राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर आंदोलक तेथील स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाही दिसले.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीचं ट्विट

हा व्हिडीओ पाहा

श्रीलंकेतील परिस्थितीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचार थांबवण्यासाठी शुक्रवारी (8 जुलै 2022) देशातील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला. पोलिस प्रमुख चंदना विक्रमरत्ने यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हजारो लोक राष्ट्रपतींना बेदखल करण्यासाठी कोलंबोमध्ये दाखल झाले. आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याच्या तोफगोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आल्या. मात्र, संतप्त आंदोलकांनी ऐकले नाही. या आंदोलनाला देशातील विविध स्तरांचा पाठिंबा आहे. यामध्ये धार्मिक नेत्यांपासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत आणि व्यापारी आणि सामान्य लोकांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रपती पळून गेल्याचा व्हिडीओ

कोलंबोचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये असं म्हटलंय जात आहे की हॉटेल गलादारीने आंदोलकांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. अश्रुधुराचा त्रास सहन करणाऱ्या आंदोलकांसाठी तेथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्हायरल ट्विट

याआधी मे महिन्यात सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने विरोधकांच्या भीतीनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती . अमरकीर्ती अतुकोरला 10 मे रोजी आपल्या कारमधून नितांबुआ येथे जात होते, असे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांच्या जमावाने त्यांना घेराव घातला. जमावाच्या भीतीने त्याने गोळीबार केल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर लोकांचा राग अनावर झाला. खासदार कसेबसे गाडीतून सुटून एका घरात लपले असले तरी हजारोंच्या जमावाने इमारतीला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर भीतीपोटी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली.