AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on Shinzo Abe : शिंजो आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली भावपूर्ण श्रद्धांजली, घरचा व्यक्ती गेल्यासारखं दुःख होत असल्याची भावना

गुजरातला अधिक सक्षम करण्यासाठी जपानचे सहकार्य खूप मोठे होते. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धोरणात्मक सहकार्य करण्यात आले. सुरक्षेसंदर्भातही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्याचा भारतालाही फायदा झाला.

PM Modi on Shinzo Abe : शिंजो आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली भावपूर्ण श्रद्धांजली, घरचा व्यक्ती गेल्यासारखं दुःख होत असल्याची भावना
शिंजो आबे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jul 09, 2022 | 5:06 PM
Share

नवी दिल्ली : शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान होते. जागतिक राजनितीज्ञ होते. भारत-जपान मैत्रीचे पुरस्कर्ते होते. शिंजो आबे यांच्या निधनामुळं जगातल्या एका मोठ्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. मी वैयक्तिरीत्या एक चांगला मित्र गमावला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी म्हणतात, मी शिंजो आबे यांना पहिल्यांदा 2007 मध्ये भेटलो. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या मैत्रीनं प्रोटोकालचे नियमही बाद केलेत. शिंजो आबे यांच्यासोबतचे बरेच अविस्मरणीय क्षण आहेत. क्योटो येथील तोजी मंदिराला (Toji Temple) दिलेली भेट, शिंकानसेन येथील ट्रेनचा प्रवास, अहमदाबादमधील (Ahmedabad) साबरमती आश्रमाला दिलेली भेट, काशीतील गंगा (Ganga) आरती हे काही त्यापैकी अविस्मरणीय क्षण.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

pm 2

शिंजो आबे पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या सक्षमीकरणात मोठा हिस्सा

2007 ते 2012 ला शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान नव्हते. तेव्हाही आमचे संबंध अधिकच मजबूत होत गेलेत. सरकार, अर्थशास्त्र, संस्कृती, परदेश धोरण आदी विषयांवर त्यांच्याकडं नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. गुजरातला अधिक सक्षम करण्यासाठी जपानचे सहकार्य खूप मोठे होते. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धोरणात्मक सहकार्य करण्यात आले. सुरक्षेसंदर्भातही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्याचा भारतालाही फायदा झाला. भारत-जपान संबंधावर त्यांना पद्म विभूषण 2021 चा पुरस्कार देण्यात आला.

pm 3

शिंजो आबे, पंतप्रधान नरेंद्र मोदी

घरचा व्यक्ती गेल्यासारखं वाटत

यंदा मे महिन्यात जपान दौऱ्यात शिंजो आबे यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी जपान-भारत संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला होता. कोणालाही आकर्षित करेल, असं हे व्यक्तिमत्व होतं. वेळेवर काय आणि कसं बोलावं, याची त्यांना चांगली जाण होती. भारत-जपान संबंध मजबूत करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना त्यांच्याकडं होत्या. मे महिन्यात झालेली भेट शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं, असं मोदी म्हणतात.

pm 5

शिंजो आबे, पीएम नरेंद्र मोदी

संपूर्ण जग त्यांचं ऋणी राहील

शिंजो आबे यांना जगातील घडामोडींची जाणीव होती. त्यांच्याकडं दूरदृष्टीकोण होता. त्यामुळंच जागतिक राजनैतिक, सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर त्यांचा प्रभाव होता. धाडसी निर्णय ते घेत होते. संपूर्ण जगाला समजून घेऊन ते त्यांची वाटचाल करीत होते. शिंजो आबे यांच्या धोरणांनी जपानी अर्थव्यवस्थेला मजबूत केले. जागतिक पातळीवर केलेल्या कामांमुळं संपूर्ण जग त्यांचं ऋणी राहील.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.