AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन झाडांपासून थोड दूरच राहा, सापांची अंडी देण्याची सर्वात आवडती जागा, आसपास साप असतोच

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या काळात सापांच्या प्रजननाचा काळ असतो, काही साप हे अंडी देतात, त्यातून पिल्ले बाहेर पडतात, तर काही सापांच्या प्रजाती थेट पिल्लांना जन्माला घालतात. अशी काही झाडं आहेत, ज्याची निवड साप अंडी घालण्यासाठी करतात.

या दोन झाडांपासून थोड दूरच राहा, सापांची अंडी देण्याची सर्वात आवडती जागा, आसपास साप असतोच
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 1:51 PM
Share

सापांबद्दल प्रत्येकालाच भीती वाटते, कारण त्याला आपल्या मनात असलेले काही गैरसमज देखील कारणीभूत असू शकतात. जसं की कोणताही साप हा विषारीच असतो. त्यामुळे अनेकदा आपण साप दिसला की त्याला भीतीपोटी मारून टाकतो. परंतु तसं न करता जर तुमच्या घरात किंवा परिसरात कुठे साप निघाला असेल तर त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील. तुम्हाला माहिती आहे का? पावसाळ्याच्या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साप हे या काळात बिळात घुसून न बसता, रस्त्यावर असतात, त्यामुळे अनेकदा तुमच्या आसपास देखील तुम्हाला पावसाळ्यात साप आढळून येतात. अशा परिस्थितीमध्ये सर्पदंशाचा धोखा वाढतो.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा देखील काळ असतो, त्यामुळे या काळात साप अधिक आक्रमक बनतात, शक्यतो साप हे स्वत:हून कधीही तुमच्यावर हल्ला करत नाहीत, साप फक्त दोनच परिस्थितीमध्ये तुमच्यावर हल्ला करू शकतात. एक म्हणजे जर त्याला तुमच्यापासून काही धोका जाणवला तर आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्याची शिकार आहात असा त्याचा समज झाला तर आणि तरच तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. दरम्यान पावसाळा हा सापांचा प्रजनन काळ असतो, काही साप हे अंडी देतात, त्यातून पिल्लू जन्माला येतं. तर काही सापं हे थेट पिल्लांना जन्म देतात.

दरम्यान अशा काही विशिष्ट जागा असतात, जिथलं वातावरण हे सापांसाठी अनुकूल असतं. पावसाळ्याच्या काळात साप निवाऱ्यासाठी अशाच जागांची निवड करतात. सापाला निवाऱ्यासाठी शक्यतो कोरडं परंतु आर्द्रता जास्त असलेलं ठिकाण पोषक असतं. काही वनस्पती अशा असतात, की त्या नैसर्गिकरित्या सापांना तसं वातावरण निर्माण करू देतात, त्यामुळे साप नेहमी अशाच जागेची निवड निवाऱ्यासाठी करतो. त्यातलं एक महत्त्वाचं झाडं म्हणजे गवती चहाच झाडं, ज्या ठिकाणी हे गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं, सापांना लपण्यासाठी जागा सापडते अशा ठिकाणी या झाडाखाली साप अंडे देऊ शकतात. त्यामुळे हे झाड जास्त वाढू देऊ नये, दुसरा झाड हे नागचाफ्याचं आहे. या झाडाची पानं ही लांब लांब असतात, तसेच एक मोठं पाढंरं सुवासिक फूल या झाडाला येतं. या झाडाच्या पानांमुळे जमीन पूर्णपणे झाकून जाते, त्यामुळे साप अशा झाडाच्या आडोश्याला अंडी घालू शकतो. तसेच अनेकदा अशा झाडांच्या आसपास साप आढळून येतो.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...