Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेला जे हवं तेचं मिळाले, आंदोलनाआधीच सुप्रिम कोर्टाने दिला मोठा दिलासा
Abhijeet Dipke CJP Protest: सर्वोच्च न्यायालयाने 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके आणि विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा दिला आहे.

Abhijeet Dipke CJP: उद्या दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हे आंदोलन असणार आहे. आता याच आंदोलनापूर्वी आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारीया यांच्या खंडपीठाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना मोठा दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके आणि विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासाची मागणी करणारी आणि दिल्ली पोलिसांना ‘फ्री हँड’ (संपूर्ण अधिकार) देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या याचिकेत मागणी करण्यात आली होती की, न्यायपालिकेप्रमाणेच पोलिसांनाही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सार्वभौम आणि स्वतंत्र घोषित केले जावे. याचिकेत म्हटले होते की, जोपर्यंत पोलिसांची कृती कायद्याच्या विरोधात नसेल, तोपर्यंत त्यांच्या सार्वभौम कार्यात हस्तक्षेप केला जाऊ नये.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान, वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी असा युक्तिवाद केला की, जेव्हा प्रत्यक्ष पक्षकार न्यायालयात हजर नसतात, तेव्हा न्यायालयाच्या हस्तक्षेपासाठी जनहित याचिकांचा (PILs) वापर केला जातो. ते म्हणाले की, लोक दररोज न्यायालयात असे येतात जणू काही ती त्यांची वैयक्तिक मालमत्ताच आहे.
या युक्तिवादावर प्रतिक्रिया देताना, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, न्यायालयाचा प्रत्येक आदेश १००% अचूक असेल याची कोणतीही हमी नाही. ते म्हणाले, “एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयाने कलम १४२ लागू करायला नको होते, असे तुमचे म्हणणे आहे का? कृपया समजून घ्या की हे तरुण विद्यार्थी आहेत. आपल्याला त्यांच्या पालकांचा आणि त्यांच्या भविष्याचाही विचार करावा लागेल. या तरुणांना वारंवार न्यायालयात यावे लागावे, असे आम्हाला वाटत नाही.” आता उद्या सीजेपीचे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन आहे पण त्या आंदोलनाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही.