मोठी बातमी! गोधरा रेल्वे अग्निकांडातील दोषीला दिलासा, जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती!

गोधरा ट्रेन अग्निकांडाची घटना 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात राज्यातील गोधरा रेल्वे स्थानकावर घडली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या डब्याला आग लावून देण्यात आली होती. या डब्यातील 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरात राज्यात मोठी दंगल उसळली होती.

मोठी बातमी! गोधरा रेल्वे अग्निकांडातील दोषीला दिलासा, जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती!
godhra case and supreme court
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 2:32 PM

Godhra Case: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 2002 सालच्या गोधरा रेल्वे अग्निकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोषीला मोठा दिलासा दिलाय. त्याची प्रकृती आणि आरोग्यविषयक अडचण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दोषी जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या द्विसदस्यी खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावरणी पार पडली. याचिकाकर्त्याने आरोग्याची अडचण असल्याचे कारण देत माझी शिक्षा स्थगित करावी, अशी विनंती न्यायालया केली. सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने गोध्रा रेल्वे अग्निकांडातील या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे.

आरोग्यविषय स्थिती लक्षात घेऊन दिलासा

संबंधित आरोपी हा गेल्या 18 वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 2022 साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावून देण्यात आली होती. या अग्निकांडात एकूण 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. सोमवारी दोषीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरकारी वकील स्वाती घिल्डियाल यांनीही याचिकाकर्त्यांच्या वैद्यकीय अडचणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आरोग्यविषय स्थिती लक्षात घेऊन याचिककार्ता दिलासा देण्याची मागणी करत असेल तर यावर सरकारला आक्षेप नाही, अशी भूमिका यावेळी सरकारी वकिलाने मांडली.

Loading...

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

बार अंड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्याने प्रामुख्याने आरोग्यविषयक स्थितीच्या आधारावरच दिलासा देण्याचे अपील केलेले होते. सरकारी वकिलांनीही दोषीच्या आरोग्यविषयक स्थितीत तथ्य असल्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन न्यायालायने दोषी व्यक्तीची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय न्यायालय घेतला.

ट्रेन अग्निकांडात काय घडले होते?

गोधरा ट्रेन अग्निकांडाची घटना 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात राज्यातील गोधरा रेल्वे स्थानकावर घडली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या डब्याला आग लावून देण्यात आली होती. या डब्यातील 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरात राज्यात मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृृत्यू झाला होता. बिल्किस बानो प्रकरणही याच दंगलीत घडले होते. बिल्किस बाने यांच्या कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या करण्यात आली होती. यात बिल्कीस बानो यांच्या 3 वर्षीय मुलीचा समावेश होता. बिल्कीस बानो गर्भवती असताना दंगेखोरांनी यांच्यावर बलात्कार केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us