ट्रेन आहे की लक्झरी हॉटेल ? मुंबई-बंगळुरु वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट AC कोच पाहून आश्चर्यचकीत व्हाल…Video viral

Vande Bharat Sleeper: भारतीय रेल्वेच्या बहुप्रतिक्षित मुंबई-बंगळूरू 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचा फर्स्ट एसी कोच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील प्रायव्हेट केबिन पाहून तुम्हाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलात बसल्याचा फिल येईल...

ट्रेन आहे की लक्झरी हॉटेल ? मुंबई-बंगळुरु वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट AC कोच पाहून आश्चर्यचकीत व्हाल...Video viral
Vande Bharat Sleeper
| Updated on: Jun 20, 2026 | 8:00 PM

Vande Bharat Sleeper: वंदेभारत एक्सप्रेस आता रेल्वेचा प्रवास लक्झरी झाला आहे. वंदेभारत एक्सप्रेस न केवळ प्रवास आरामदायी झाला तर वेगवान देखील झाला आहे. आतापर्यंत वंदेभारत एक्सप्रेसची चेअर कार आवृत्ती अस्तित्वात होती. आता लांबच्या प्रवासासाठी नवीन वंदेभारत स्लीपर दाखल झाली आहे. मुंबई ते बंगलुरु दरम्यान आता लवकरच ‘वंदे भारत स्लीपर’ चालवण्यात येणार आहे. या आलिशान ट्रेनचा फर्स्ट एसी (First AC) कोचचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. याची तुलना एखाद्या लक्झरी 5 स्टार हॉटेलच्या रुमशी केली जात आहे. एका व्हायरल व्हिडीओत वंदेभारतचा फर्स्ट एसी (First AC) कोच दिसत आहे. युजर्सने या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत.

वंदेभारत स्लीपर ट्रेन खास करुन रात्रीच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. या ट्रेनच्या फर्स्ट एसी (First AC) कोचमधील इंटेरिअर, प्रकाश योजना, प्रीमियम फिनिशिंग आणि रिकाम्या जागांचा केलेला योग्य वापर पाहून ही एखादी परदेशातील ट्रेन वाटत आहे. यात खास प्रायव्हेट केबिन तयार केले असून ते एखाद्या विमानासारखे आहेत. ही ट्रेन संपूर्णपणे मॉडर्न आणि आलिशान दिसत आहे.

पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली दरम्यान सुरु झाली होती. आज सध्या देशभरात १०० हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत.मात्र या सर्व ट्रेन चेअर कार वाल्या होत्या. आता यात शयनकार आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्री आरामात झोपता येणार आहे. फर्स्ट एसी कोचमध्ये तर प्रायव्हेट केबिन आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रायव्हेट केबिनची तुलना एखाद्या लक्झरी हॉटेलशी केली जात आहे.

खास सुविधा काय आहेत ?

शानदार केबिन आणि आसने : रात्रीचा प्रवास आरामदायक करण्यासाठी आलिशान व्यवस्था

हॉटल सारखे टॉयलेट्स: जुन्या दुर्गंधीयुक्त टॉयलेट्सच्या जागी आता स्वच्छ आणि मॉडर्न बायो-टॉयलेट्स

हाय-टेक सुरक्षा: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यात सर्वत्र सीसीटीवी (CCTV) कॅमऱ्यांचा पाहारा

डिजिटल डिस्प्ले: प्रवासामधील स्थानकांची माहिती देण्यासाठी आधुनिक डिस्प्ले स्क्रीन

येथे पाहा व्हिडीओ –

वंदेभारत स्लीपरने फायदा

मुंबई आणि बंगलुरु या दोन महानगरांदरम्यान रोज हजारो लोक बिजनस आणि फिरण्यासाठी प्रवास करत असतात. त्यामुळे ही रात्रीच्या प्रवासाठी एक आयडिल ट्रेन होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांना रात्रभर आरामदायक प्रवास करता येणार आहे. ट्रेन सुरु होण्याच्या तारखेची अजून प्रतिक्षा आहे. परंतू ट्रेनच्या पहिल्या लूकने इंटरनेटवर हंगामा केला आहे.

 

Follow Us