AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Tukaram Mundhe FDA Actions: आता महाराष्ट्रातील अन्न विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. दादरमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर आता तुकाराम मुंढे याचा इफेक्ट पाहायला मिळाला आहे.

Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल
| Updated on: Aug 26, 2026 | 11:50 AM
Share

Tukaram Mundhe FDA: महाराष्ट्रात सुरू असलेली अन्न सुरक्षा मोहीम आणि धाडी हा आता फक्त राज्याभरापुरतीचा विषय राहिलेला नाही आता तो देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या कारवाईच्या केंद्रस्थानी आयएएस अधिकारी, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे आहेत. मे महिन्यात एफडीए आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी अन्न सुरक्षेचे उल्लंघन आणि अस्वच्छ अन्न उत्पादनांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. ते मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, गोदामे आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर सातत्याने कारवाई करत आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तुकाराम मुंडे आयुक्त झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ३,००० हून अधिक छापे आणि तपासण्या केल्या आहेत. या कारवाईमुळे डॉमिनोजची चार आणि पिझ्झा हटच्या एका आउटलेटसह अनेक प्रमुख खाद्य व्यवसायांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तुकाराम मुंडे यांनी क्रिकेट क्लब, लोकप्रिय रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि इतर नामांकित आस्थापनांसह कोणालाही सोडले नाही. सर्वत्र छापे टाकले जात आहेत.

आता तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला सगळेच अन्नविक्रेते घाबरले आहेत. प्रत्येकांच्या मनात एकच भीती आहे की पुढचा नंबर आपला नसावा. अनेक प्रसिद्ध आऊटलेटसवरही धाडी पडल्याने लोकही चकित झाले आहेत. अनेक अन्न विक्रेत्यांनी आता स्वच्छेतेकडे विशेष भर दिली आहे. आता यातच मुंबईकरांचा फेव्हरेट असलेला वडपावबद्दल एक बातमी समोर आली आहे. दादरचा फेम स्वामी समर्थ वडापाव विक्रेत्याने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दादरमधील ‘स्वामी समर्थ’ वडापाव स्टॉलवर दिसणार मोठा बदल

मुंबईतील वडापाव विक्रेत्यांमध्ये तुकाराम मुंढेंची चांगलीच धास्ती पसरल्याची पाहायला मिळत आहे. आता वडापाव विक्रेते हे हायजिन मेंटेन करुन वडापाव विकत आहे. वडापाव विक्रिसाठी नवे नियम लागू केले आहेत. या नियमानंतर दादरच्या शिवसेना भवन जवळील प्रख्यात श्री स्वामी समर्थ वडापाव स्टाॅलवर आता एक बदल पाहायला मिळणार आहे. स्टॉलवर वडापाव बांधून देण्यासाठी आता वृत्तपत्राचा वापर न करता  बटर पेपरचा वापर सुरु आहे. तर विक्रेत्यांकडून डोक्यावर सेफ्टी कॅप वापरायला सुरुवात झाली आहे.

Follow Us
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांची मराठी सक्ती विरोधात जनहित याचिका
मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव