महंतस्वामी महाराजांकडून विजयादशमीच्या शुभेच्छा, प्रभू श्रीराम आणि माता दुर्गेच्या पावलावर चालण्याचे आवाहन

देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात दसरा हा सण साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या या खास दिवशी स्वामीनारायण अक्षरधामचे परम पूज्य महंतस्वामी महाराजांनी देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

महंतस्वामी महाराजांकडून विजयादशमीच्या शुभेच्छा, प्रभू श्रीराम आणि माता दुर्गेच्या पावलावर चालण्याचे आवाहन
Mahant Swami Maharaj
| Updated on: Oct 02, 2025 | 10:16 PM

देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात दसरा हा सण साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या या खास दिवशी स्वामीनारायण अक्षरधामचे परम पूज्य महंतस्वामी महाराजांनी देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भक्तांना प्रभू श्रीराम आणि माता दुर्गेच्या पावलावच चालण्याचे आवाहन केले. महंत स्वामी महाराजांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

परम पूज्य महंतस्वामी महाराजांनी देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वांना विजया दशमी या पावन दिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा. भारतात दसऱ्याच्या सणाला मोठे महत्व आहे. सनातन हिंदू धर्मात दसऱ्याचा सण धर्म आणि अधर्माच्या संघर्षातील सत्य आणि सद्गुणांच्या विजयाचे प्रतिक आहे.

आपल्याला दुर्गुणांवर विजय मिळवायचा आहे

प्रभू श्रीरांमांनी रावणावर विजय मिळवला, माता दुर्गेने महिषासुराचा वध केला. यांच्या स्मृतित हा विजया दशमी सण साजरा केला जातो. आपल्यालाही आपल्या आतमध्ये असणाऱ्या दुर्गुणांवर विजय मिळवायचा आहे. कारण यामुळे आपल्याला दु:ख होतं. रावण काम दोषाने दु:खी होता. दुर्योधन हा लोभामुळे दु:खी होता, त्यामुळे स्वभाव हा मानसाचा शत्रू आहे.

कितीही संकटे आली तरी देवावर विश्वास ठेवा

भक्ती आणि संताच्या कृपेने यावर विजय मिळवावा लागेल, हीच खरी विजयादशमी असेल. जीवनात किहीही संकटे आली तरी देवावर विश्वास ठेवा आणि धर्म, सत्य आणि करुणेच्या मार्गावर चालत राहिल्यास शेवटी विजय तुमचाच असेल.प्रत्येक कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी वाढत जाओ आणि देवाच्या कृपेने तुमच्या सर्वांना आयुष्यात खऱ्या अर्थाने विजय मिळो ही माझी प्रार्थना.