AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tabassum Death: सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला, प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन

तबस्सुमने 1947 मध्ये बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर 'फुल खिले हैं गुलशन-गुलशन' हा सेलिब्रिटी टॉक शो होस्ट केला

Tabassum Death: सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला, प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन
अभिनेत्री तबस्सुम Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 19, 2022 | 8:22 PM
Share

मुंबई, सदाबहार अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन (Tabassum Death) झाले आहे. बाल अभिनेत्री आणि सेलिब्रिटी टॉक शो होस्ट म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा होशन गोविल यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.  त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  तबस्सुमला काल म्हणजेच शुक्रवारी रात्री दोन हृदयविकाराचे झटके आले. त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका सकाळी 8:40 वाजता आणि दुसरा 8:42 वाजता आला, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. आज मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 मुलगा होशन यांनी दिली निधनाची माहिती

होशन गोविल म्हणाले, ‘काल रात्री 8.40 वाजता आईचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिला वाचविण्यात यश आले नाही. आम्ही आमच्या शोसाठी आधीचे 10 दिवस शूट केले आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा शूटिंग करणार होतो. दरम्यान ही घटना घडली. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

1947 मध्ये तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली

विशेष म्हणजे तबस्सुमने 1947 मध्ये बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर ‘फुल खिले हैं गुलशन-गुलशन’ हा सेलिब्रिटी टॉक शो होस्ट केला. तिने 1972 ते 1993 या काळात हा शो होस्ट केला होता. तबस्सुमने नर्गिसच्या विरुद्ध बालकलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले. यानंतर ती मेरा सुहाग, मजहदार आणि बडी बहन यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्यांचा शेवटचा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या स्वर्ग या चित्रपटात होता.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा