AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांना बसला पहिला दणका; अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी समोर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.

भारतावर टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांना बसला पहिला दणका; अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी समोर
| Updated on: Aug 10, 2025 | 9:51 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे, अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. टॅरिफमुळे अमेरिकेमधील ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या महागाईमध्ये जुलै महिन्यात उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठोक विक्रेते आता हळूहळू टॅरिफमुळे वाढलेल्या किंमतींना आपल्या वंस्तुच्या मुळ किमतीमध्ये मिळवत असल्यामुळे देशात महागाई प्रचंड वाढली असून, सामान्य लोकांना मोठा भार सोसावा लागत आहे.

या वस्तुंचे वाढले रेट

ब्लूमबर्गने केलेल्या एका सर्व्हेनुसार जुलै महिन्यामध्ये अमेरिकेच्या महागाई निर्देशांकात 0.3 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर जूनमध्ये 0.2 टक्के एवढी वाढ झाली होती. अमेरिकेला महागाईचा याही पेक्षा अधिक झटका बसू शकतो, मात्र तिथे इंधनाचे दर कमी असल्यामुळे सध्या तरी महागाईची झळ एवढी अजून बसली नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळू शकतो असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. इंधन सोडता जवळपास इतर सर्वच वस्तुंचे दर अमेरिकेमध्ये वाढले आहेत.

भारतावर 50 टक्के टॅरिफची घोषणा

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर पुन्हा 25 टक्के अतिरिक्त टॅरीफ लावण्यात आला आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे, त्यासाठी दबावतंत्र म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, मात्र भारतानं देखील अमेरिकेला जशासतसं उत्तर दिलं आहे. आता भारताकडून देखील अमेरिकेमधील काही ठरावीक वस्तुंवर प्रत्युत्तर कर लावण्याची तयार सुरू झाली आहे, त्याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसू शकतो, ट्रम्प भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा निर्णय मागे देखील घेऊ शकतात असा अंदाज काही अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?