तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताचं बांगलादेशला मोठं गिफ्ट, घेतला सर्वात मोठा निर्णय

तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेताच आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत. भारतानं मोठी घोषणा केली असून, त्याचा मोठा फायदा बांगलादेशला होणार आहे.

तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताचं बांगलादेशला मोठं गिफ्ट, घेतला सर्वात मोठा निर्णय
भारताची बांगलादेशला मोठी भेट
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 7:31 PM

बांगलादेशमध्ये नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये बीएनपीला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला मोठं यश मिळालं. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच आता भारत आणि बांगलादेशमधील संबंध पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेशमधील एका भारतीय उच्चपदस्थ राजदूताने म्हटलं आहे की, आता भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्ववत करेल. यामुळे आता बांग्लादेश आणि भारतामधील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुसचं काळजीवाहू सरकार असताना दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती, दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. मात्र आता तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार बांगलादेशमधील भारतीय उच्चपदस्थ राजदूत अनिरुद्ध दास यांनी म्हटलं आहे की, भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्वत करेल, त्यासाठी आवश्यक पाऊलं उचलली जात आहेत. मेडीकल आणि डबल एन्ट्री व्हिसा आता जारी करण्यास सुरुवात झाली आहे.ट्रॅव्हल व्हिसा आणि दुसऱ्या इतर विभागातील व्हिसा देखील लवकरच पूर्ववत केले जातील. ते बांगलादेशच्या सिलहट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लबमध्ये बोलत होते.

भारताने 17 डिसेंबर 2025 मध्ये बांगलादेशची व्हिसा सर्व्हिस सस्पेंड केली होती. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, बांगलादेशमध्ये आता बीएपीची सत्ता आली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे, त्यानंतर भारताकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार असताना भारत आणि बांगलादेशमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते, बांगलादेशकडून वारंवार या काळात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला जात होता. मात्र आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे, कारण नव्या सरकारकडून या आधीही हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवला जाईल, मात्र त्यामुळे भारत बांगलादेश संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.