
मोठी बातमी समोर येत आहे, एका नेत्याचा नको त्या अवस्थेमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. दरम्यान त्यानंतर आता हिमाचल प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांगडा जिल्ह्यातल्या जवाली येथे असलेल्या जलशक्ती विभागाच्या विश्राम गृहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये विश्रामगृहात दारूच्या बाटल्यांचे तुकडे, चिकनचे अवशेष आणि फाटलेले कपडे सर्वत्र पसरलेले दिसत आहेत. विश्रामगृहात आलेल्या पाहुण्यांना आराम करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोफ्यावर प्रचंड घाण करण्यात आली आहे, एवढंच नाही तर घटनास्थळी कंडोम देखील आढळून आले आहेत. यावरून असं दिसून येत आहे की, या विश्रामगृहामध्ये दारूची मोठी पार्टी झाली आहे, तसेच इतरही काही अयोग्य गोष्टी झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसच्या काही युवा नेत्यांवर आरोप करण्यात येत आहे. परवानगी न घेताच काँग्रेसचे काही युवा नेते विश्रामगृहात आले आणि त्यांनीच हा सर्व राडा केल्याची माहिती समोर येत आहे.
सुरक्षा रक्षकाला धमकावलं
घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना अभियंता अजय शर्मा यांनी म्हटलं की, काँग्रेसचे काही युवा नेते परवानगी न घेताच विश्रामगृहामध्ये आले. सुरक्षा रक्षकाने त्यांना विचारलं असता, त्यांनी सुरक्ष रक्षकाला देखील धमकी दिली. या लोकांनी विश्रामगृहात राडा केला, त्यांनी विश्राम गृहाच्या फरशीवरच दारूच्या बाटल्या फोडल्या, सोफा देखील खराब केला, तसेच तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील धमकावलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, या प्रकरणात जवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान मंत्र्यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात जे लोक सहभागी होते, त्यांच्यावर कडक कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.असे प्रकार खपवून घेणार नाही, कडक कारवाई करू असं आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचं अभियंता यांनी सांगितलं.