Bus Accident : भयंकर मोठा अपघात… किंचाळ्या आणि रक्ताचा सडा… थेट बसमध्येच घुसली हायस्पीड लॉरी… 20 हून अधिक लोक ठार

Telangana Bus Accident : तेलंगणमधील रंगारेड्डी येथे झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे, तर अनेक नागरिक भयानक जखमी झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Bus Accident : भयंकर मोठा अपघात... किंचाळ्या आणि रक्ताचा सडा... थेट बसमध्येच घुसली हायस्पीड लॉरी... 20 हून अधिक लोक ठार
भीषण बस अपघात
| Updated on: Nov 03, 2025 | 11:23 AM

तेलंगणच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे झालेल्या बस अपघातातील मृतांची संख्या वाढून 20 वर पोहोचली आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे, तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडळातील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोची आरटीसी बस गिट्टीने भरलेल्या टिप्पर ट्रकला समोरासमोर धडकली तेव्हा ही दुर्घटना घडली. मात्र ही ध़क एवढी भीषण होती की टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आत कोसळली आणि अनेक प्रवाी चिरडले गेले. या भीषण अपघातामध्ये टिप्पर चालकाचाही जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते. त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

ही जबर धडक होऊन झालेल्या अपघातानंतर बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला, आरडा-ओरडा, किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले, अफरातफरी माजली आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. बसमध्ये प्रवासी अक्षरश: चिरडले गेले होते, जखमींच्या किकाळ्या, रक्ताने भरलेली सीट असे दृश्य दिसत होते.

अपघाताचे वृत्त कळताच  स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य जलद गतीने पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तात्काळ हैदराबादमधील रुग्णालयात हलवावे सूचना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता नसावी आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक स्तरावरील परिस्थितीची माहिती देण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट्स देण्याचीही सूचना दिली आहे. तसेच घटनास्थळाजवळील मंत्र्यांनी तातडीने तेथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचेही निर्देश दिले आहेत.