मोदीजी इतनी क्रूरता क्यों ? तेलंगणाचे केसीआर यांचा पंतप्रधानांवर घणाघात…

| Updated on: Oct 30, 2022 | 7:19 PM

नरेंद्र मोदीजी तुम्हाला दोन वेळा सत्ता मिळूनही इतरांची सरकार पाडण्याची क्रूर कामं तुम्ही का करता आहात, असा सवाल केसीआर यांनी केला आहे.

मोदीजी इतनी क्रूरता क्यों ? तेलंगणाचे केसीआर यांचा पंतप्रधानांवर घणाघात...
Follow us on

नवी दिल्लीः तेलंगणातील मुनुगोडे जागेवर पोटनिवडणूक होत असून त्यामुळे येथील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी टीआरएसने भाजपवर घोडे बाजारचा आरोप केला होता. त्याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी टीका करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना सांगितले की, माझ्यासोबत चार आमदार हैदराबादहून मुनुगोडे येथे आले आहेत. जे माझे चार आमदार आहेत, त्यांनी आमच्या सरकारविरुद्ध केलेल्या कारस्थानात सहभाग घेतला होता, मात्र आता दिल्लीतील त्या दलालांकडून करोडो रुपये घेण्यास नकार दिला होता.

त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी रविवारी दावा केला की मुनुगोडे पोटनिवडणुकीच्या आधी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) चार आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या आरोपामुळे प्रचंड मोठा गदारोळ उठला आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील एका फार्महाऊसवर घडलेल्या घटनेचीही त्यांनी आठवण करुन दिली.

यावेळी केसीआर यांनी ज्या टीआरएसच्या चार आमदारांनी लाच नाकारली त्यांचेही त्यांनी कौतूक केले. त्या आमदारांना पक्ष बदलण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर नाकारुन तेलंगणातील सत्याच्या बाजूने उभा राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

तेलंगणा सरकार पाडण्यासाठी भाजप 20-30 टीआरएस आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधताना नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी ते म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना विचारतो आहे की, ही क्रूरता का? अजून तु्म्हाला किती शक्ती आणि ताकद हवी आहे? तुम्ही दोन वेळा निवडून आला आहात, तरीही तुम्ही इतरांची सरकार कोसळण्याचा मार्ग का अवलंबविता असा सवालही त्यांनी सवाल केला आहे.

सध्या चंचलगुडा तुरुंगात असलेले आरएसएसचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याशिवाय या कृत्यात सहभागी होते का? तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना या विषयावर शांत बसू नका असे आवाहन करुन मतदान करण्यापूर्वी विचार करण्यास सांगितले.

भाजपवर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही गाढवांना खाऊ घातला तर तुम्हाला गायीचे दूध मिळणार नाही असा जोरदार टोलाही लगावला.