आतंकवाद्यांशी हात मिळवणी महागात!, सलाहुद्दीनच्या मुलासह काश्मीरमधील 4 जणं नोकरीवरून बडतर्फ

पाकिस्तानच्या हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद याच्यासह दहशतवादी बिट्टा कराटेच्या पत्नी आणि इतर चौघांना जम्मू-काश्मीर सरकारने बडतर्फ केलं आहे.

आतंकवाद्यांशी हात मिळवणी महागात!, सलाहुद्दीनच्या मुलासह काश्मीरमधील 4 जणं नोकरीवरून बडतर्फ
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 2:41 PM

श्रीनगर : पाकिस्तानच्या हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनशी (Sayyad Salahuddin) संबंधित एक मोठी बातमी. पाकिस्तानच्या हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद याच्यासह दहशतवादी बिट्टा कराटेच्या पत्नी आणि इतर चौघांना जम्मू-काश्मीर सरकारने बडतर्फ केलं आहे. दहशतवादींसोबत संबंध आढळल्याने चौघांनाही नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं आहे. यात बिट्टा कराटेच्या पत्नीचाही समावेश आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. बिट्टा कराटे हा दहशतवादी आहे. ज्याने स्वतःच कबुली दिली होती की, काश्मिरी पंडितांच्या हत्येत त्याचा हात होता. बिट्टा कराटे (Bitta Karate) याची काश्मीरी खोऱ्यात त्याची दहशत आहे. विशेषत: काश्मिरी पंडितांमध्ये त्याच्याविषयी धास्ती आहे. ‘पंडितांचा कसाई’, असं त्याला संबोधलं जातं. जानेवारी 1990 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या हिच्या अपहरणानंतर काश्मिरी पंडितांना लक्ष केलं गेलं. काही भागात हत्याकांडही झालं. बिट्टा कराटे याने या हत्याकांडाचं नेतृत्व केलं. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा एक प्रमुख चेहरा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. जून 1990 मध्ये त्याला अटक झाली.

नोकरीवरून बडतर्फ

पाकिस्तानच्या हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद याच्यासह दहशतवादी बिट्टा कराटेच्या पत्नी आणि इतर चौघांना जम्मू-काश्मीर सरकारने बडतर्फ केलं आहे. दहशतवादींसोबत संबंध आढळल्याने चौघांनाही नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं आहे. यात बिट्टा कराटेच्या पत्नीचाही समावेश आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

बिट्टा कराटे कोण आहे?

बिट्टा कराटे हा दहशतवादी आहे. ज्याने स्वतःच कबुली दिली होती की, काश्मिरी पंडितांच्या हत्येत त्याचा हात होता. बिट्टा कराटे याची काश्मीरी खोऱ्यात त्याची दहशत आहे. विशेषत: काश्मिरी पंडितांमध्ये त्याच्याविषयी धास्ती आहे. ‘पंडितांचा कसाई’, असं त्याला संबोधलं जातं. जानेवारी 1990 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या हिच्या अपहरणानंतर काश्मिरी पंडितांना लक्ष केलं गेलं. काही भागात हत्याकांडही झालं. बिट्टा कराटे याने या हत्याकांडाचं नेतृत्व केलं. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा एक प्रमुख चेहरा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. जून 1990 मध्ये त्याला अटक झाली.