जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर मोठा दहशतवादी हल्ला, एका PSOसह दोघांचा मृत्यू

| Updated on: Mar 29, 2021 | 3:44 PM

सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर मोठा दहशतवादी हल्ला, एका PSOसह दोघांचा मृत्यू
Follow us on

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर फरीदा खान या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. फरीदा खान यांना परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.(Terrorist attack on MP’s meeting in Sopore, Jammu and Kashmir)

या हल्ल्यात किती दहशतवादी सहभागी होते याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. दहशतवादी त्याच परिसरात लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलांचनी नाकाबंदी करत शोधमोहीम हाती घेतलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या सोपोरमधील लोन बिल्डिंगमध्ये सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात BDC सदस्यांसह PSO जखमी झाले. हल्ल्यानंतर पळून जाताना दहशतवाद्यांनी काऊन्सिलरवर फायरिंग केलं. तिथे तैनात असलेल्या एका PSOने दहशतवाद्यांना प्रतुत्तर देण्याचा प्रयत्न केला पण ते दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले. त्यावेळी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

जम्मू काश्मीरमध्ये नुकताच एक दहशतवादी हल्ला झाला होता. यात उत्तरी काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. पोलीस चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पोलीस चौकीवर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली होती.

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये 27 जानेवारी रोजी एक दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी झाले. अनंतनगामधील बिजबेरा या भागात भारतीय सैन्याने गस्तीवर असताना हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसरात दहशतवाद्यांचा शोध सुरु केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील शम्शीपुराजवळील श्रीनगर-जम्मू हायवेवर जवान गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. उत्तरादाखल भारतीय जवानांनीसुद्धा दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला. मात्र, दहशतवादी या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले.

इतर बातम्या :

पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराने होळी समारंभातच कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली, बाबुल सुप्रियो नव्या वादात

Terrorist attack on MP’s meeting in Sopore, Jammu and Kashmir