तामिळनाडूच नव्हे तर या राज्यातही आहे मोफत वीज, कोण देतंय जास्त फायदा,वाचा….
मुख्यमंत्री झाल्याच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. यात सर्वाधिक चर्चा २०० युनिट मोफत वीज देण्याच्या निर्णयाची होत आहे. देशातील अनेक राज्यातील मोफत वीज योजनांची त्यामुळे चर्चा सुरु आहे. कोणत्या राज्यात किती वीज मोफत आहे हे पाहूयात....

Free Electricity: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती Vijay यांनी शपथ घेताच लागलीच मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे.मुख्यमंत्री झाल्याच्य पाहिल्याच दिवशी त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा २०० युनिट मोफत वीजेच्या निर्णयाची होत आहे. याशिवाय विजय सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी खास स्पेशल फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रत्येक जिल्ह्यात एण्टी – ड्रग युनिट स्थापण्याचा निर्णयही घेतला आहे.
तसेच राज्यातील २०२१ ते २०२६ मधील आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका जारी करण्याची घोषणा देखील विजय थलपती यांनी केली आहे. तामिळनाडूतील मोफत वीज योजनेच्या घोषणेनंतर आता देशातील अन्य राज्यातील योजनांवर देखील चर्चा सुरु आहे. अनेक राज्यात आधीच घरगुती ग्राहकांना मोफत वीज सबसिडी दिली जात आहे. कुठे १०० युनिट तर कुठे ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळत आहे.
Tamil Nadu मध्ये २०० यूनिट मोफत वीज
नवे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारने घरगुती ग्राहकांसाठी २०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्यात १०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळत होती. त्यात हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य जनता आणि मध्यमवर्गाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Delhi त २०० यूनिटपर्यंत वीज मोफत
दिल्लीत आधीच घरगुती ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. जर एखाद्या घराचा वीज खर्च २०१ ते ४०० युनिट्स दरम्यान होत असेल तर सरकार ५० टक्के सबसिडी देते. मात्र, यासाठी ग्राहकांना दरवर्षी सबसिडी योजनेत सामील व्हावे लागते.
Bihar मध्ये १२५ यूनिट वीज मोफत
बिहार सरकारने देखील घरगुती ग्राहकांना मोफत वीज दिली आहे. मुख्यमंत्री वीज ग्राहक सहायता योजने अंतर्गत दर महिन्याला १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे. ही योजना ऑगस्ट २०२५ पासून लागू करण्यात आली आणि २०२६ पर्यंत जारी रहाणार आहे.
Punjab मध्ये ३०० यूनिटपर्यंत दिलासा
पंजाबमध्ये घरगुती वीज ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळते. ही सुविधा दोन महिन्यांचय्या बिलिंग सायकलमध्ये ६०० युनिटपर्यंत लागू होते.
Uttar Pradesh शेतकऱ्यांना दिलासा
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक योजना सुरु आहे. राज्यात खाजगी ट्युबवेलसाठी १४० युनिटपर्यंत मोफत वीजेसारखी सुविधा दिली जात आहे. याशिवाय जुन्या वीज बिलांवर व्याज माफी सारखी योजना देखील लागू आहेत.
केंद्र सरकारची देखील योजना –
केंद्र सरकारची PM Surya Ghar Muft Bijli Yojana देखील चर्चेत आहे. या योजनेंतर्गत लोकांना घरांच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी दिली जाते. योजनेचा उद्देश्य लोकांना दर महिन्यास ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा आहे.