AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थलपती विजय यांच्या यशावर मुलाने अखेर सोडलं मौन; म्हणाला ‘माझ्या करिअरचा विषय आला तेव्हा..’

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांना आणि त्यांच्या पक्षाला मिळालेल्या प्रचंड यशावर अखेर त्यांच्या मुलाने मौन सोडलं आहे. जेसन संजयने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे वडिलांनी कोणता सल्ला दिला होता, याबद्दलही तो व्यक्त झाला आहे.

थलपती विजय यांच्या यशावर मुलाने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'माझ्या करिअरचा विषय आला तेव्हा..'
थलपती विजय आणि त्यांचा मुलगा जेसन संजयImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2026 | 2:54 PM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचं खासगी आयुष्य अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असतं. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके पक्षाने मोठा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयावर त्यांच्या पत्नी किंवा मुलांकडून मात्र कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय यांचा मुलगा जेसन संजय याने पहिल्यांदाच यावर वक्तव्य केलं आहे. विजय यांची पत्नी संगीताने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तेव्हापासून मुलं आणि पत्नी त्यांच्यापासून दुरावल्याचं चित्र आहे.

‘बिहाइंड वुड्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत जेसन म्हणाला, “ही एक ऐतिहासिक क्रांती आहे. यामुळे माझ्यावर, माझ्या बहिणीवर किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबावर हा वारसा पुढे नेण्याची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. आम्हाला हे सुरक्षित ठेवावं लागेल, आम्हाला खूप काळजीपूर्वक आणि दक्ष राहावं लागेल.” यावेळी संजयने वडिलांनी त्याला दिलेल्या सल्ल्याविषयीही सांगितलं आहे. “मी माझी स्वत:ची ओखळ निर्माण करावी, अशी त्यांची इच्छा होती. आम्हा दोघांसाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आमचे विचार जुळत होते, आमची ध्येयेसुद्धा एकसारखीच होती. एक वडील म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला. पण जेव्हा माझ्या करिअरचा विषय आला, तेव्हा त्यांनी मला स्वत:हून गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला कधीही सर्वकाही सहज दिलं नाही. मी त्यांचा, माझ्या आईचा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा खूप आभारी आहे”, असं तो म्हणाला.

थलपती विजय यांचा मुलगा जेसन संजय हा ‘सिग्मा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची पत्नी संगीता किंवा त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. या सोहळ्याला फक्त विजय यांचे आईवडील एस. ए. चंद्रशेखर आणि शोभा, त्यांचा चुलत भाऊ उपस्थित होते. त्याचसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीची सर्वाधिक चर्चा होती. त्रिशा आणि विजय हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इतकंच नव्हे तर तिने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं