एका चुकीच्या एसएमएसने झाला पर्दाफाश, बंद फ्लॅटमधून नरकाची दुर्गंधी, गर्लफ्रेंडच्या मृतदेहासोबत…
प्रत्येक आरोपीला वाटते ही आपला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही. मात्र, गुन्हेगार काहीना काही चुका करतोच त्यामुळे पोलिस त्याच्यापर्यंत पोहचतात, अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या करुन तो तिच्या प्रेतासह अनेक दिवस घरात राहात होता. मात्र अचानक एक अशी चुक झाली की या गु्न्ह्याला वाचा फुटली. या तरुणीच्या मित्र आणि मैत्रिणींना तिचा थांगपत्ता काही लागत नव्हता. अनेक दिवसांपासून ही तरुणी गायब होती. अखेर अशी अशी चूक घडली त्यामुळे सारे पितळ उघड झाले. गुन्हेगाराने कितीही प्रयत्न केला तरी खुनाला अखेर वाचा फुटतेच आणि या तरुणीचा खूनी असलेला तिचा प्रियकर अखेर गजाआड झाला…
ब्राझीलच्या बेलो होरिजोटे शहरात ही खळबळ जनक घटना आहे. या ३५ वर्षी महिला स्टिफानी रिबेरो फिरमिनो सिल्वा अनेक दिवसांपासून गायब झाली होती. सुरुवातीला तिच्या आप्तस्वकीयांना वाटले की तिच्या खाजगी कामात व्यस्त असेल. परंतू तिच्या मोबाईलवरुन आलेल्या एका संशयास्पद संदेशाने या प्रकरणाला अचानक वाचा फुटली. या घटनेने सर्वांना धक्काबसला आहे. पोलिस जेव्हा या महिलेच्या प्रियकरांच्या फ्लॅटमध्ये पोहचले तर तीव्र दुर्गंधीने त्यांना उलट्या झाल्या…फ्लॅटमध्ये रजई खाली या तरुणीचे अनेक दिवसांपासून सडत असलेला मृतदेह होता. या प्रकरणात तिच्या बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एका शब्दाने सारा खेळ बदलला…
स्थानिक बातमीनुसार सार्वजनिक जीवनातून अचानक गायब झालेल्या स्टिफानी हीच्या मित्रांना तिचे संदेश फोनवरुन मिळत होते. त्यामुळे सुरुवातीला सर्वकाही नॉर्मल वाटत होते. परंतू एका शब्दाने सारा खेळ बदलला. पोतुगाली भाषेत ‘धन्यवाद’ म्हणण्यासाठी पुरुष “Obrigado” आणि महिला “Obrigada” शब्दाचा वापर करतात. स्टिफानी हिच्या मोबाईल संदेशात नेहमी “Obrigada” लिहिलेले असायचे. मात्र, यावेळी तिच्या संदेशात शेवटी “Obrigado” लिहिले होते. तिच्या मैत्रिणीला ही गोष्ट खूप अजब वाटली. तिला संशय आला की हा संदेश स्टिफानी हिने पाठवलेला नाहा.कोणीतरी भलताच तिच्या मोबाईलने मॅसेज पाठवत आहे. त्यानंतर तिने तिला वॉईस मॅसेज पाठवायला सांगितले.
संशय वाढल्याने स्टिफानीच्या मैत्रीणीने तिला व्हॉईस मॅसेज पाठवण्यास सांगितले.कारण ती सुरक्षित आहे की नाही याचा संशय तिच्या मित्र आणि मैत्रीणींना आला. नंतर त्यांनी ठरवले जर व्हॉईस मॅसेज आला नाही तर पोलिसांकडे तक्रार करायची. या एका निर्णयाने संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली.
स्टिफानी हिच्या शेजारील लोकांना तिच्या फ्लॅटमधून अनेक दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत होती. आधी लोकांनी दुर्लक्ष केले होते. परंतू दिवसेंदिवस तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी हैराण झाले होते. तसेच स्टिफानी अनेक दिवस घरातून बाहेर येताना दिसली नाही. तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना तक्रार केली होती. पोलिस फ्लॅटचा दरवाजा खोलून आत गेली तर आती दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. स्टिफानी हीचा मृतदेह अनेक ब्लँकेटच्या खाली लपवून ठेवला होता. मृतदेह सडून गेला होता. मृत्यू होऊन तीन ते पाच दिवस झाले होते. या दरम्यान तिचा प्रियकर तिच्या मृतदेहासोबतच त्याच फ्लॅटमध्ये रहात होता.
हत्येनंतर फोन वापरत होता
आरोपीने स्टिफानी हीचा हत्या केल्यानंतर देखील तिचा मोबाईलचा वापर करुन तिच्या आप्तस्वकीयांना, मित्र परिवालाला ती जीवंत असल्याचे भासवण्यासाठी सतत संदेश पाठवणे सुरु ठेवले होते. मात्र, पोतुर्गिज भाषेतील एका व्याकरण चुकीमुळे तिच्या मैत्रिणींना संशय आला आणि या महिलेच्या हत्येचा गुंता सोडवण्यास पोलिसांना मदत मिळाली आहे.