1500 ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले, भारताच्या क्रूझ उद्योगातील नव्या पर्वाची सुरुवात

चेन्नईहून सात रात्रींच्या आग्नेय आशिया समुद्रसफरीही नियोजित आहेत. या प्रवासात भारतीय पर्यटकांना फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूर यांसारख्या ठिकाणांना भेट देता येईल. क्रूझ सुट्ट्यांसाठी कोची हे आणखी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार ‘कॉर्डेलिया स्काय’ मुंबईहून सेवा सुरू करत असताना ‘कॉर्डेलिया एम्प्रेस’ कोचीला आपले नवे होमपोर्ट बनवेल

1500 ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले, भारताच्या क्रूझ उद्योगातील नव्या पर्वाची सुरुवात
Cordelia Cruise
| Updated on: Oct 15, 2026 | 2:42 PM

1500 ड्रोनच्यारोषणाईने मुंबईचे आकाश उजळले. कॉर्डेलिया क्रूझेसने सादर केले दुसरे जहाज कॉर्डेलिया स्काय
नेत्रदीपक हवाई सोहळ्याने भारताच्या क्रूझ उद्योगातील नव्या पर्वाची सुरुवात; कॉर्डेलियाचा ताफा दोन जहाजांचा झाला, कोची हे नवे होमपोर्ट ठरले आणि 2027 मध्ये ‘कॉर्डेलिया सन’ दाखल होणार. रविवारी संध्याकाळी मुंबईचे रात्रीचे आकाश एका भव्य सोहळ्याचे साक्षीदार ठरले. भारतातील प्रीमियम क्रूझ सेवा असलेल्या कॉर्डेलिया क्रूझेसने महालक्ष्मी रेसकोर्सच्या आकाशात 1500 ड्रोनच्या विशेष समन्वित शोद्वारे आपल्या दुसऱ्या जहाजाचे कॉर्डेलिया स्कायचे आगमन साजरे केले. प्रकाश, संगीत आणि हालचालींच्या सुरेख संगमातून साकारलेल्या या हवाई शोने कॉर्डेलिया क्रूझेसच्या पाच वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला. ड्रोनच्या विविध रचनांमधून भारत, मुंबई आणि कॉर्डेलिया स्कायची खास ओळख साकारण्यात आली. अखेरीस आकाशात जहाजाची भव्य प्रतिकृती उभी राहिली. या सोहळ्यात कंपनीच्या भविष्यातील योजनांची झलकही पाहायला मिळाली.

कंपनीचे तिसरे जहाज कॉर्डेलिया सन ऑक्टोबर 2027 मध्ये ताफ्यात दाखल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमाला निमंत्रित पाहुणे, व्यावसायिक भागीदार, माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर महत्त्वाचे हितधारक उपस्थित होते. कॉर्डेलियाने आतापर्यंत केलेला प्रवास आणि भारतातील क्रूझ पर्यटनाच्या भविष्यासाठीची कंपनीची महत्त्वाकांक्षा या सोहळ्यातून अधोरेखित झाली. कॉर्डेलिया स्कायचे आगमन हा कंपनीसाठी निर्णायक टप्पा आहे.

Loading...

आतापर्यंत एका जहाजाद्वारे सेवा देणारी कंपनी आता दोन जहाजांचा ताफा चालवणार आहे. कॉर्डेलिया स्काय’ मुंबईहून सेवा देईल, तर कॉर्डेलिया एम्प्रेस कोचीहून प्रवास सुरू करेल. त्यामुळे भारताच्या पश्चिम आणि दक्षिण किनारपट्टीवरील दोन महत्त्वाच्या केंद्रांमध्ये कंपनीची उपस्थिती वाढेल, अधिक प्रवाशांना सामावून घेता येईल आणि भारतीय पर्यटकांना क्रूझ सुट्टीचे अधिक पर्याय उपलब्ध होतील.

या प्रसंगी कॉर्डेलिया क्रूझेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युर्गेन बेलोम म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझेस सुरू करताना अधिकाधिक भारतीयांसाठी क्रूझ प्रवास हा सुट्टीचा एक पर्याय बनवण्याचे आमचे ध्येय होते. दुसऱ्या जहाजाचे स्वागत करणे हा त्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो तितक्याच खास पद्धतीने साजरा करायचा होता. कॉर्डेलिया स्काय आमच्या ताफ्यात दाखल होत असताना, मुंबईच्या आकाशात हा सोहळा साजरा करण्यापेक्षा उत्तम मार्ग कोणता असू शकतो? सुरुवातीपासूनच मुंबई आमच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिली आहे.

आजची संध्याकाळ केवळ नव्या जहाजाच्या स्वागतापुरती मर्यादित नाही. आपण किती पुढे आलो आहोत आणि पुढे किती रोमांचक प्रवास बाकी आहे, याचा हा उत्सव आहे. कॉर्डेलिया स्काय’ मुंबईहून सेवा सुरू करेल, कॉर्डेलिया एम्प्रेस कोचीहून नवे पर्व सुरू करेल आणि कॉर्डेलिया सन 2027 मध्ये ताफ्यात दाखल होईल. या माध्यमातून क्रूझ सुट्टी ही भारताच्या प्रवास, उत्सव आणि पर्यटन संस्कृतीचा भाग बनवण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकत आहोत.

2021 मध्ये सेवा सुरू केल्यापासून कॉर्डेलिया क्रूझेसने 8 लाखांहून अधिक प्रवाशांचे स्वागत केले आहे. त्यामुळे अधिकाधिक भारतीय पर्यटकांपर्यंत क्रूझ सुट्टीचा अनुभव पोहोचण्यास मदत झाली आहे. कॉर्डेलिया स्कायच्या समावेशामुळे कंपनीच्या विस्ताराच्या पुढील टप्प्याला सुरुवात होत आहे. यामध्ये मोठा ताफा, अधिक प्रवासी क्षमता, विस्तारित गंतव्यस्थळांचे जाळे आणि जहाजावरील अनुभवांचे अधिक पर्याय यांचा समावेश आहे.

कॉर्डेलिया स्काय आणि कॉर्डेलिया एम्प्रेस या दोन्ही जहाजांमध्ये मिळून 1798  स्टेटरूम्स असतील आणि दोन प्रवाशांच्या प्रति केबिन या आधारावर सुमारे 3,596  प्रवासी प्रवास करू शकतील. एकाच जहाजाद्वारे सेवा दिली जात होती त्या तुलनेत ही क्षमता सुमारे 126 टक्क्यांनी वाढेल. या विस्तारामुळे कॉर्डेलिया क्रूझेसला दोन वेगवेगळ्या होमपोर्टवरून एकाच वेळी सेवा देता येईल. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतातील उपस्थिती अधिक मजबूत होईल आणि पर्यटकांना त्यांच्या सोयीने क्रूझ सुट्टी निवडण्याची अधिक मुभा मिळेल.

यापुढील विस्ताराचा भाग म्हणून कॉर्डेलिया क्रूझेसने तिसरे जहाज कॉर्डेलिया सन नोव्हेंबर 2027 मध्ये ताफ्यात दाखल होणार असल्याचेही जाहीर केले आहे. भारतातील क्रूझ पर्यटनाचा बाजार विकसित करण्याची आणि भारतीय पर्यटकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी यातून दिसून येते.

‘कॉर्डेलिया स्काय’ची ओळख: समुद्रप्रवासातील अनुभवांचे मोठे विश्व

258 मीटर लांबी आणि 77,104 ग्रॉस टनेज (GT) असलेल्या ‘कॉर्डेलिया स्काय’मध्ये दोन प्रवाशांच्या प्रति केबिन या आधारावर 2,004 प्रवासी प्रवास करू शकतात. जहाजावर एकूण 1002 स्टेटरूम्स असून त्यात 245 मिनी-सुइट्सचा समावेश आहे. समुद्रप्रवासात विविध अनुभव देता यावेत, या उद्देशाने जहाजावर जेवणासाठी 10 ठिकाणे 11 बार आणि लाउंज, 930 आसनांचे ‘मार्की थिएटर’, दोन स्विमिंग पूल, पाच हॉट टब आणि 30,000 चौरस फुटांहून अधिक खुली डेक जागा उपलब्ध आहे.

प्रवाशांना प्रादेशिक भारतीय पदार्थांसह इटालियन खाद्यपदार्थ आणि सुशी अशा भारतीय व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आस्वाद घेता येईल. पूर्णपणे शाकाहारी आणि जैन भोजनाचे पर्यायही उपलब्ध आहेत. थेट मनोरंजन, नाट्यप्रयोग, खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम, आरोग्य व तंदुरुस्तीच्या सुविधा तसेच लहान मुले आणि किशोरवयीनांसाठी स्वतंत्र जागा यांमुळे कुटुंबे, जोडपी आणि एकत्र प्रवास करणाऱ्या समूहांसाठी विविध अनुभव मिळतात.

कॉर्डेलिया स्कायची मुंबईहून पहिली व्यावसायिक समुद्रयात्रा 23 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होणार आहे. यात कमी कालावधीच्या सहलींपासून ते दीर्घ सुट्ट्यांपर्यंत विविध पर्याय असतील. यामध्ये समुद्रात दोन रात्रींची क्रूझ, गोव्याला तीन रात्रींची सहल, लक्षद्वीपला चार रात्रींची क्रूझ आणि गोवा व लक्षद्वीप या दोन्ही ठिकाणांचा समावेश असलेली पाच रात्रींची सहल यांचा समावेश आहे.

चेन्नईहून सात रात्रींच्या आग्नेय आशिया समुद्रसफरीही नियोजित आहेत. या प्रवासात भारतीय पर्यटकांना फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूर यांसारख्या ठिकाणांना भेट देता येईल. क्रूझ सुट्ट्यांसाठी कोची हे आणखी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार ‘कॉर्डेलिया स्काय’ मुंबईहून सेवा सुरू करत असताना ‘कॉर्डेलिया एम्प्रेस’ कोचीला आपले नवे होमपोर्ट बनवेल. या जहाजाच्या व्यावसायिक समुद्रसफरी 25 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होण्याचे नियोजन आहे.

या निर्णयामुळे दक्षिण भारतात कॉर्डेलिया क्रूझेसची उपस्थिती वाढेल आणि केरळ तसेच आसपासच्या भागातील पर्यटकांना क्रूझ सुट्टीचा अनुभव अधिक जवळून घेता येईल. कोचीहून ‘कॉर्डेलिया एम्प्रेस’ शनिवार-रविवारच्या छोट्या सहली, लक्षद्वीपसाठी अधिक विस्तारित समुद्रसफरी आणि मालदीवमधील माले तसेच श्रीलंकेतील कोलंबोला जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुद्रसफरी उपलब्ध करून देईल.

या विस्तारामुळे लक्षद्वीपमधील मिनिकॉय आणि कवरत्ती यांसारखी अतिरिक्त ठिकाणेही प्रवासाच्या पर्यायांत समाविष्ट होतील. त्यामुळे क्रूझद्वारे या बेटांचा अनुभव घेण्याच्या अधिक संधी पर्यटकांना मिळतील. कोचीहून नियमित क्रूझ सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची ये-जा वाढेल. तसेच बंदर सेवा, स्थानिक पुरवठादार आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांसाठी संधी निर्माण होऊन प्रादेशिक पर्यटन अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशी कॉर्डेलिया क्रूझेसची अपेक्षा आहे.

भारतातील क्रूझ सुट्ट्यांचे भविष्य घडवताना

‘कॉर्डेलिया स्काय’चा समावेश, कोचीमधील विस्तार आणि 2027 मध्ये ‘कॉर्डेलिया सन’चे नियोजित आगमन या सर्व गोष्टी भारतातील क्रूझ सुट्ट्यांचा बाजार अधिक व्यापक करण्याच्या कंपनीच्या मोठ्या उद्दिष्टाचा भाग आहेत. अधिक जहाजे, प्रस्थानासाठी आणखी बंदरे, विविध प्रवासमार्ग आणि भारतीय पर्यटकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार केलेले अनुभव यांच्या माध्यमातून क्रूझ प्रवास हा अधिक परिचित आणि सहज उपलब्ध होणारा सुट्टीचा पर्याय बनवण्याच्या दिशेने कॉर्डेलिया क्रूझेस काम करत आहे.

मुंबईतील या नेत्रदीपक सोहळ्यानंतर ‘कॉर्डेलिया स्काय’ 23 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या पहिल्या प्रवाशांचे स्वागत करेल आणि कॉर्डेलिया क्रूझेसच्या समुद्रप्रवासातील नव्या अध्यायाची सुरुवात होईल.

कॉर्डेलिया क्रूझेसविषयी

कॉर्डेलिया क्रूझेस ही भारतातील प्रीमियम क्रूझ सेवा आहे. भारतीयांना ज्या पद्धतीने प्रवास करायला, उत्सव साजरे करायला आणि नवी ठिकाणे अनुभवायला आवडतात, त्यानुसार ही सेवा आखण्यात आली आहे. भारतात क्रूझ प्रवासाला सुट्टीचा पसंतीचा पर्याय बनवण्याच्या उद्देशाने कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांसाठी समुद्रसफरी उपलब्ध करून देते. भारतीय आदरातिथ्य, जागतिक दर्जाची सेवा आणि जहाजावरील विविध अनुभव यांचा यात संगम आहे.

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडविषयी

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेड ही भारतातील आघाडीची क्रूझ कंपनी असून भारतीय पर्यटकांसाठी क्रूझ सुट्ट्यांची संकल्पना लोकप्रिय करण्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे. कॉर्डेलिया क्रूझेसच्या माध्यमातून कंपनी क्रूझ प्रवास अधिक सुलभ आणि अनुभवकेंद्रित बनवत आहे. आदरातिथ्य, मनोरंजन आणि विविध गंतव्यस्थळे यांचा एकाच समुद्रसफरीत अनुभव देणे हा यामागील उद्देश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us