GK: जगातला सर्वात महागडा पदार्थ कोणता ? सोने-प्लॅटिनियम नव्हे, एका ग्रॅमची किंमत ४१ कोटी किलो सोन्याऐवढी, कोणता पदार्थ ?

जगातील सर्वात महाग वस्तू म्हटले की सोने, चांदी आणि प्लॅटिनियम किंवा हिरे तुमच्या नजरेसमोर येतील. मात्र,जगातले हे महागडे पदार्थ नाहीत. जगात एक अशीही महागडी वस्तू आहे. ज्यांच्या समोर हिरे - माणकं देखील फिके आहेत.

GK: जगातला सर्वात महागडा पदार्थ कोणता ? सोने-प्लॅटिनियम नव्हे, एका ग्रॅमची किंमत ४१ कोटी किलो सोन्याऐवढी, कोणता पदार्थ ?
antimatter price
| Updated on: Nov 07, 2026 | 12:01 AM

धनतेरस निमित्ताने सोने चांदीची खरेदी तुम्ही केली असेल. जगातला सर्वात महागडा पदार्थ म्हटला की तुमच्या नजरेसमोर सोने, हिरे आणि प्लॅटिनियम धातू समोर येईल. परंतू जगातला सर्वात महागडा पदार्थ आहे अँटीमॅटर आहे. एक ग्रॅम एंटीमॅटर मध्ये ४१ कोटी किलो सोने, हो खरंच आहे. काय आहे हा एंटीमॅटर पदार्थ ज्याला प्रतिपदार्थ असे म्हटले जाते. आणि तो एवढा महाग का आहे ? जाणून घेऊयात..

जगातील सर्वात महाग वस्तू म्हटले की सोने, चांदी आणि प्लॅटिनियम किंवा हिरे तुमच्या नजरेसमोर येतील. मात्र,जगातले हे महागडे पदार्थ नाहीत. जगात एक अशीही महागडी वस्तू आहे. ज्यांच्या समोर हिरे – माणकं देखील फिकी पडतात.

Loading...

तुम्हाला एंटीमॅटर माहिती आहे का ?

हा पदार्थ कोणत्या सराफाकडे मिळत नाही, तर वैज्ञानिक प्रयोगशाळेत हा तयार केला जातो. याच्या एका ग्रॅमची किंमत सुमारे २० ट्रिलियन डॉलरमध्ये म्हणजे ७४ लाख अब्ज रुपयांहून अधिक असते. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचे झाले तर सुमारे १०० देशांची अर्थव्यवस्थांना जरी एकत्र तर इतके पैसे एकत्र होऊ शकत नाहीत, जे याच्या एक ग्रॅमला विकत घेता येईल. हा पदार्थ कोणताही सामान्य धातू नाही.

नासाने दिलेल्या माहितीनुसार एंटीमॅटरच्या एका ग्रॅमची किंमत ९० ट्रिलियन डॉलर असते. एवढी तर १०० छोट्या -छोट्या देशांची एकत्रित अर्थव्यवस्था असते. एंटीमॅटर आपल्या वातावरणातील इतर धातूंप्रमाण जमिनीच्या आत सापडत नाही. याचा वापर अंतराळ संबंधित कामासाठी होतो. वैद्यकीय क्षेत्रातही कॅन्सरच्या उपचारासाठी याचा वापर होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us